Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानसभेचे विरोधक होताहेत महायुतीचे भागीदार; मेगाभरतीमुळे मित्रपक्षातच पडणार ठिणगी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 June 2025, 13:29
mega bharati in mahayuti in solapur district

सोलापूर: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकेमकांच्या विरोधात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लढवलेले नेतेमंडळी आता महायुतीचे भागीदार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुका लढवताना काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा निवडणू‌का पार पडल्यानंतर सध्या महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. भाजपसह एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रवेशसोहळे होताना दिसत आहेत. त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. लोकसभेला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना दिलीप माने, अमर पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे यांनी आपापल्या तालुक्यातून विरोध केला होता.

त्यांनी त्यावेळी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना मदत केली होती. विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम म्हेत्रे हे भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टींविरोधात लढले आहेत, तर दक्षिणमधून अमर पाटील हे भाजपाच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात लढले आहेत. सुरेश हसापुरे यांनी सुभाष देशमुख यांच्या विरोधातही प्रचार केला आहे. मात्र आता हे सर्व विरोधी नेते महायुतीत येण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. यामधील अमर पाटील शिंदे यांच्या सेनेत आले आहेत. त्यांना जिल्हा प्रमुखही केले आहे, तर दुसरीकडे सिद्धाराम म्हेत्रे हे ५ जून रोजी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर सुरेश हसापुरे हे भाजप, तर दिलीप माने हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे.

शहर मध्यमधून तौफीक शेख यांनी भाजपाच्या देवेंद्र कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. बड्या नेत्याला प्रवेश देत असताना महायुतीचे हित न पाहता केवळ पक्षाचे हित पाहून प्रवेश दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जशी जवळ येईल, तसे आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या निमित्ताने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीला फायदा होणार ?

आगामी काळात महायुती म्हणून जर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील, तर जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात वाद पाहिला मिळतील आणि याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार आहे. जर महायुतीमधील सर्वच पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेल्यास हेच नेते पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभारतील. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणारा जेरबंद; शिरूर पोलिसांची कारवाई

Tuesday, 24 February 2026, 9:50

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34
Next Post

पैशांसाठी सासरच्यांकडून बेल्टने मारहाण; मारहाणीचे पुरावे असणारा मोबाईलही हिसकावला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.