Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur : ‘हा अपघात नाही, निष्काळजीपणाचा परिणाम!’ कचरा गाडीचा डाला अंगावर कोसळून सफाई कामगाराचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 20:14
Nagpur

photo- social media

Nagpur : नागपूरच्या सक्करदरा परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या एका दुर्घटनेने शहर हादरून गेले. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटा गाडीवर काम करत असताना कचऱ्याचा संपूर्ण डाला अचानक अंगावर कोसळल्याने एका कंत्राटी सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धार्थ ऊर्फ सिद्धू घोडके (वय ३९, रा. अजनी) असे मृत कामगाराचे नाव आहे.

नेहरू नगर झोनअंतर्गत बुधवार बाजार परिसरात सिद्धार्थ घोडके हे रविवारी सकाळी कर्तव्यावर होते. ए.जी. एन्व्हिरो प्रा. लि. या खासगी कंत्राटी कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या कचरा गाडीवर ते कार्यरत होते. कचरा उचलण्याचे काम सुरू असताना गाडीच्या हायड्रोलिक प्रणालीत बिघाड झाला आणि दुरुस्ती दरम्यान अचानक डाला सुटून थेट त्यांच्या अंगावर कोसळला. डोक्याला जबर मार बसल्याने ते कचऱ्याखाली दबले गेले. (Nagpur)

सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सफाई कामगारांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. सिद्धार्थ यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असून कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरपला आहे.

 

कामगार संघटना आणि नातेवाईकांनी कंत्राटी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. अनेक कचरा गाड्यांचा विमा नसणे, वारंवार तांत्रिक बिघाड होणे आणि हायड्रोलिक यंत्रणेबाबत आधी तक्रारी असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू ओढवला, असा आरोप आंदोलकांचा आहे.

घटनेनंतर संतप्त कामगार आणि नातेवाईकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. कंत्राटी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची मदत द्यावी आणि पत्नीला नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही घटना केवळ अपघात नसून, शहरातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आणणारी आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Thursday, 30 July 2026, 8:26

इराणने डागली क्षेपणास्त्रे अन् ट्रम्प संतापले! ‘आता आमची पाळी’ म्हणत अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई सुरू

Thursday, 30 July 2026, 8:13

शेतकऱ्यांनो! कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटते? सरकारने सांगितली पुढची प्रक्रिया

Thursday, 30 July 2026, 7:59

मान्सूनचा रौद्रावतार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 30 July 2026, 7:45

Daily Horoscope: गुरुवारचा महायोग! गुरुच्या आशीर्वादाने ‘या’ राशींची होणार चांदी; पाहा आजचे राशीभविष्य

Thursday, 30 July 2026, 7:37

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20
Next Post
Pune News: Punekars beware! When the 'silencer' of a bullet rings, it is now a crime; Pune Police's 'surgical strike' on bullet riders

Pune News: पुणेकरांनो सावधान! बुलेटचा 'सायलेन्सर' वाजला की आता थेट गुन्हा; बुलेटस्वारांवर पुणे पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.