Friday, July 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मला दोघंही आवडतात” तरुणीचं दोघांवर प्रेम जडलं; दोघांशी संबंध ठेवले अन् प्रेमाच्या त्रिकोणातून एकाच भयानक शेवट…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 15:32

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र अटकेदरम्यान आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर मुख्य आरोपीला जामीन मिळाला आहे.

मृत तरुणाचे नाव सलमान अशफाक अन्सारी (रा. संघर्षनगर) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सलमान आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. याच कारणावरून त्याचा मुजम्मील ऊर्फ मुज्जू हसन अली (वय 20, रा. गांजाखेत) याच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता.

मंगळवारी मध्यरात्री टिपू सुलतान नगर चौक परिसरात दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपी मुजम्मीलने धारदार चाकूने सलमानवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सलमान गंभीर जखमी झाला.

 

घटनास्थळावरून त्याला तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

प्रकरणाचा तपास करत यशोधरानगर पोलिसांनी मुख्य आरोपी मुजम्मील आणि त्याचा साथीदार साहील मलिक (वय 19, रा. चारखंबा, पाचपावली) यांना अटक केली. दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी अटकेच्या प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला. अटक केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांना त्याची माहिती देणे आणि अटकेचे कारण कळविणे ही कायदेशीर आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रक्रिया पूर्ण न झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला.

या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटी नोंदवली आणि मुख्य आरोपी मुजम्मील याला जामीन मंजूर केला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, खून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापूरात जंक्शन एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा; १,००० एकर जमीन हस्तांतरण प्रक्रियेला वेग

Friday, 10 July 2026, 12:00

पुण्यात तब्बल 8 दिवसांनी सूर्य दर्शन! पुढील आठवडाभर पावसाचं ‘नो टेन्शन’

Friday, 10 July 2026, 11:36

कोरोनाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा! 2 मृत्यू, 4 संक्रमित; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Friday, 10 July 2026, 11:15

दरड कोसळली, गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी गाव सोडले अन् रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी मारला डल्ला; लोणावळा येथील घटना

Friday, 10 July 2026, 10:56

महाबळेश्वर येथे घरात डोकावल्याच्या संशयावरून भिगवणच्या तरुणाची हत्या; चौघांना अटक

Friday, 10 July 2026, 10:31

गावगाड्याच्या राजकारणाला ब्रेक लागणार?15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर मोठा निर्णय..

Friday, 10 July 2026, 10:28
Next Post

अपोलो कंपनी कामगार संघटनेचे सदस्य युवराज शेळके यांचे अपघाती निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.