Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांचे आमदार असं काही बोलले की…; टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 March 2025, 20:07

नाशिक:नाशिक मधून एक बातमी समोर आली आहे. येथील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. आज शेतकऱ्यांनी सभापती आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवून निषेध केला. वारंवार आश्वासने मिळूनही शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीसमोर आंदोलन केले.

 

अधिक माहिती अशी की, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी अनेकवेळा मागणी करूनही व्यापाऱ्यांनी अजून पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार बनकर यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी केल्यानंतर आमदार बनकर यांनी “तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही” असे वक्तव्य आंदोलकांसमोर केले. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले.

प्रशासनाकडून केवळ आश्वासने, अंमलबजावणी शून्य

तेथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही बाजार समितीसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी “15 मार्चपर्यंत व्यापाऱ्यांकडून सर्व थकबाकी वसूल केली जाईल” असे आश्वासन शेतकऱ्यांना संचालक मंडळाकडून देण्यात आले होते. मात्र, आता मार्च महिना संपत आला तरीही अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्यास उतरले आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, मात्र प्रत्यक्षात आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही, अशी नाराजी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी सरकार आणि महसूल प्रशासनाने या विषयाकडे त्वरित लक्ष द्यावे.व्यापाऱ्यांकडून त्वरित पैसे वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा तसे न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Thursday, 9 April 2026, 10:18

महिलांना नोकरी द्यायचे अन् नंतर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव? बड्या IT कंपनीतील धक्कादायक प्रकार

Thursday, 9 April 2026, 10:04

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागात मोठे फेरबदल; गोविंद येतयेकर आणि ओमप्रकाश चौहान यांच्याकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 9 April 2026, 9:57

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08
Next Post

आमदाराकडून त्रास, ग्रामसेवकाच्या पत्नीने औषध पेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; तक्रार दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.