Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीडच्या 843 ऊसतोड महिला मजुरांची गर्भपिशवी काढली? चित्रा वाघ यांचा मोठा खुलासा, खरी माहिती आली समोर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 June 2025, 16:10

ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमधून दरवर्षी जवळपास 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीसाठी बाहेर राज्यात जातात. यामध्ये 78 हजार महिला मजुरांचा समावेश आहे. अलीकडे समोर आलेल्या एका अहवालानुसार, यापैकी 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही बाब समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली. मात्र या प्रकरणावर भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महत्त्वाचा खुलासा करत या माहितीत अर्धसत्य आणि दिशाभूल करणारा भाग असल्याचं सांगितलं आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

चित्रा वाघ म्हणाल्या की, “843 महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रियेची बातमी ऐकून मलाही स्त्री म्हणून धक्का बसला. पण जेव्हा यामागचं सत्य तपासलं, तेव्हा लक्षात आलं की ही माहिती संपूर्ण सत्य नाही. उलट, शासनाने महिलांच्या आरोग्यासाठी 2019 पासून काही नियमानुसार या शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. आता कोणतीही महिला अचानक किंवा जबरदस्तीने ही शस्त्रक्रिया करू शकत नाही.” त्यांच्या माहितीनुसार, 2019 पासून बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया फक्त वैद्यकीय कारणांमुळेच आणि जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीने केल्या जातात. त्यातही गर्भपिशवी काढण्याचा निर्णय डॉक्टरांच्या तपासणीनंतरच घेतला जातो.

शस्त्रक्रियेचा कालावधी आणि आकडेवारी

 

बीड जिल्हा रुग्णालयात 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 267 महिलांवर गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया वैद्यकीय गरजेमुळे करण्यात आली. उर्वरित 576 महिलांची शस्त्रक्रिया 2019 पूर्वीच झालेली आहे. याचा ऊसतोड हंगामाशी थेट संबंध नसल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.त्यामुळे “843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली” अशी एकत्रित मांडणी ही भ्रामक आणि चुकीच्या अर्थाने वाचली जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

आरोग्य तपासणीत गंभीर बाबी उजेडात

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर मजुरांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीतूनच संबंधित माहिती समोर आली. यामध्ये एकूण 1,523 महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे आढळून आले आहे.
30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेची संख्या जास्त असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. ऊसतोडणीच्या काळात महिलांना प्रचंड शारीरिक श्रम, प्रवास आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक महिलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले. “महिला, आरोग्य आणि गरिबी यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना पूर्ण माहिती घेऊनच ती प्रकाशित करावी, अशा प्रकारची अपूर्ण माहिती समाजात भीती आणि गैरसमज पसरवते,” असं आवाहन चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केलं.

बीडमधील ऊसतोड महिला मजुरांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, आकडेवारी आणि वास्तव परिस्थिती यांचा सुसंगत अभ्यास करूनच समाजासमोर यावं, असा सल्ला राज्यातील महिला नेतृत्वाकडून देण्यात येतोय. या प्रकारावर फक्त राजकीय प्रतिक्रिया न देता, आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54

लोणी काळभोर येथे महालक्ष्मी देवीच्या गळ्यातील 10 लाखांचं सोन्याचं गंठण गायब; परिचित महिलेवर चोरीचा संशय

Saturday, 24 October 2026, 10:42

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 10:37
Next Post

'काळ्या काचां' विरोधात बारामती वाहतूक पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; फॉर्च्यूनर, स्कॉर्पिओ, थारपासून अल्टोपर्यंत कारवाईचा धडाका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp