Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saksham Tate Murder : सक्षम हत्या प्रकरणाला नवं वळण! ‘आम्हाला न्याय हवा’ आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; स्वतःला जाळून घेण्याच्या प्रयत्नात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 December 2025, 15:47
Saksham Tate Murder: New twist in Saksham murder case! 'We want justice' Mother and lover pour petrol on themselves in front of the District Collector's office; In an attempt to set themselves on fire...

नांदेड : शहरातील सक्षम ताटे (Saksham Tate Murder) हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र (Anchal Mamidvar) हादरून गेला होता. जातीयवादातून घडलेल्या या ऑनर किलिंगच्या (Nanded Honor Killing) घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. नांदेड पोलिसांनी या (Nanded News) प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मात्र अटकेत (Nanded Viral News) असलेल्या एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट अद्याप सक्रिय असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या अकाउंटचे नाव ‘हिमेश मामिडवार 302’ असे असून त्यावर आरोपीचे हातात बेड्या घातलेले आणि पोलिसांच्या ताब्यातील फोटो पोस्ट करण्यात आले होते. (Latest Marathi News)

 

दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मृत सक्षम ताटेची आई आणि त्याची प्रेयसी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी दोषी असून त्यांना आरोपी करावे, अशी मागणी सक्षमच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आज मृत युवकाची आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, आंचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांची ओळख 2022 मध्ये झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात डांबून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने सक्षमविरोधात POCSO कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली. मात्र प्रकरण तपासणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दोघांचे नाते परस्पर संमतीने असल्याचे स्पष्ट करत POCSO लागू होत नसल्याचे सांगितले होते. तरीही आंचलच्या कुटुंबाने तक्रार मागे घेण्यास नकार दिला.

आंचल 18 वर्षांची झाल्यानंतर तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन POCSO प्रकरण मागे घ्यायचे असल्याचे निवेदन दिले होते. सक्षमचे कुटुंब आंबेडकरवादी बौद्ध समाजाचे असून आंचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू समाजातील आहे. जातभेद आणि प्रतिष्ठेच्या कारणावरून मामिडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकत धर्मांतराची अट घातली होती. सक्षमने प्रेमासाठी धर्मांतराची तयारी दर्शवली होती, मात्र कुटुंबाचा स्वीकार केवळ दिखावा असल्याचे नंतर स्पष्ट झाले आणि त्यातूनच ही धक्कादायक हत्या झाल्याचे समोर आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Crime News: घरगुती वाद टोकाला पोहचला, दिरासोबत मिळून रचला पतीच्या हत्याकांडाचं षडयंत्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.