Wednesday, February 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Youth Death: कणकवलीतील लॉजमध्ये पुण्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 February 2026, 11:47
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune Youth Death: कणकवली : कणकवली (Kankavali) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या उत्कर्षा लॉजमध्ये 35 वर्षीय तरुण मृतावस्थेत (Pune Youth Death) आढळला आहे. या घटनेमुळे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अलंकार अशोक नाईक असून तो पुणे येथील कर्वेनगर भागातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलंकार नाईक हा 13 फेब्रुवारी रोजी कणकवली येथे आला होता. त्याने बस स्थानकासमोरील उत्कर्षा लॉजमध्ये राहण्यासाठी खोली बुक केली होती. गेल्या दोन दिवसांपासून तो याच लॉजमध्ये वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास लॉजचा कर्मचारी खोलीचे भाडे विचारण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेला. दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक वेळा हाका मारूनही दरवाजा न उघडल्याने संशय बळावला.

यानंतर कर्मचाऱ्याने तातडीने लॉजच्या मालकांना ही माहिती दिली. मालकांनी त्वरित कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. खोलीत प्रवेश केल्यानंतर अलंकार नाईक हा निपचित अवस्थेत आढळला. त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत मृतदेहाजवळ कोणतीही मोठी झटापट झाल्याची स्पष्ट चिन्हे आढळली नाहीत. मात्र मृताच्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट आवळलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मृत तरुणाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलिस तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Best Hair Oil: केस अकाली पांढरे होतायत किंवा गळतायत? मग तेलाची निवड करताना ‘ही’ चूक टाळा

Wednesday, 25 February 2026, 13:36
Accident

Accident : क्रेनचा पट्टा तुटला अन् महिलेच्या डोक्यावर कोसळली क्रेनची सळई; वनवडी पोलिसात गुन्हा दाखल.

Wednesday, 25 February 2026, 13:33

Crime News: आधी नोकरीचं आमिष, मग अमानुष छळ! अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीचे गंभीर आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Wednesday, 25 February 2026, 13:11

Pune Crime News: स्वतःच्या अपहरणाचा बनाव; दोन लाखांची खंडणी मागणारा युवक जेरबंद 

Wednesday, 25 February 2026, 13:09

Pune News: पुणेकरांनो! तुमच्याकडे 15 वर्षे जुनी गाडी आहे? मग ही बातमी वाचाच

Wednesday, 25 February 2026, 13:05
Agriculture News

Agriculture News : १२ हजारांचा लाभ रखडला! २०१९ नंतर जमीन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

Wednesday, 25 February 2026, 12:51
Next Post

Surya Grahan 2026: आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; भारतात दिसणार का? सुतकाचे नियम काय? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.