Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोंगरदऱ्यात शिकारीला गेले आणि परतलेच नाहीत! कणकवलीतील प्रसिद्ध व्यावसायिकाची हत्या; माजी आमदारांची पोलीस ठाण्यात धाव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 March 2026, 12:52

Crime News : सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशांत जनार्दन दळवी असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे कळसुली गावचे रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी कणकवली जवळील मुरे डोंगरी परिसरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह पोलीस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलीस यंत्रणेने वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासांत या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सुशांत दळवी यांची हत्या त्यांचाच मुकादम अमर सत्यवान कदम याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कुडाळ ओरस परिसरातून अमर कदमला ताब्यात घेतले असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी आणि अमर कदम हे दोघेही शिकारीसाठी डोंगराळ भागात गेले होते. दळवी यांना शिकारीचा छंद होता, मात्र, शिकारीच्या दरम्यान ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून किंवा उद्देशाने करण्यात आली, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. दळवी यांचे पार्थिव पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेलीतील ग्रामपंचायतींचे प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वितरित करा... सभापती युवराज काकडे यांची जिल्हा परिषदेकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.