T20 World Cup IND VS PAK: वाद, चर्चा आणि अनिश्चिततेच्या छायेनंतर अखेर क्रिकेटविश्वाची नजर खिळवून ठेवणारा भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. उद्या (रविवारी, 15 फेब्रुवारी) रोजी गट टप्प्यातील ही बहुप्रतीक्षित लढत पार पडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा तिसरा सामना असून, विजय मिळवणाऱ्या संघाला पुढील फेरीचे तिकीट जवळपास निश्चित होणार आहे. त्यामुळे सामना ‘करो या मरो’ स्वरूपाचा ठरणार आहे.

बहिष्कारानंतर तिढा सुटला
काही दिवसांपूर्वी बांगलादेश स्पर्धेबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका जाहीर केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली. चर्चांच्या फेऱ्यांनंतर अखेर पाकिस्तानने बहिष्कार मागे घेतला आणि सामन्याचा मार्ग मोकळा झाला.
सामना कधी आणि कुठे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे होणार आहे.
नाणेफेक: सायं. 6.30 (भारतीय वेळेनुसार)
सामना सुरू: सायं. 7.00
थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारतामध्ये सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर प्रेक्षकांना सामना पाहता येणार आहे.
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर.
पाकिस्तान संघ
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.
जागतिक क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कोलंबोतील हा सामना स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







