Thursday, March 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : हडपसर-यवत प्रवासाचा मार्ग मोकळा! 5262 कोटींच्या सहा पदरी उड्डाणपुलासाठी निधी मंजूर; आ. राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 6 March 2026, 19:39
Yawat

photo- ppn

Yawat : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दौंड तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात या सहा पदरी उड्डाणपुलासाठी 5 हजार 262 कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद जाहीर केली आहे. या निर्णयामुळे दौंड तालुक्याच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाचे नवे दालन उघडले जाणार आहे.
पुणे शहरातून दौंड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी हडपसर-यवत हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होत असते. प्रस्तावित सहा पदरी उड्डाणपुलामुळे पुणेकरांना आणि दौंडमधील नागरिकांना विनाअडथळा आणि जलदगतीने प्रवास करता येणार असून यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे यवत, केडगाव, भांडगाव, खोर, वरवंड आणि पाटस या भागांमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा वाढणार आहे. पुण्याच्या विस्तारणाऱ्या सीमांमुळे या परिसरात नवीन कारखाने आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, महामार्गालगत वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्राचा मोठा विकास होईल, कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांचे लक्ष या भागाकडे वेधले जाईल.
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील खोर, भांडगाव, वासुंदे, जिरेगाव या जिरायती पट्ट्याला आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. महामार्ग, उड्डाणपूल आणि नियोजित विमानतळ या तिन्ही गोष्टींमुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, हा प्रकल्प दौंडसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निधी मंजूर झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे दौंड तालुक्याचे अर्थकारण बदलणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरापासून मी या सहा पदरी उड्डाणपुलासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आजच्या अर्थसंकल्पात 5262 कोटी रुपयांची तरतूद झाल्याने पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. दौंडच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

– राहुल कुल, आमदार, दौंड विधानसभा

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: Fraud of Rs 5 lakhs on the lure of a plot; Case registered against three at Loni Kalbhor police station

Loni Kalbhor News: प्लॉटच्या आमिषाने 5 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा

Thursday, 12 March 2026, 14:19

अरुण तुपेंनंतर आता प्रसिद्ध रीलस्टार काजलचा मृत्यू; वर्ध्यात मोठी खळबळ

Thursday, 12 March 2026, 14:04

उन्हाळ्यात ‘चटपटीत’ खावेसे वाटते का? जाणून घ्या त्यामागचे कारण

Thursday, 12 March 2026, 13:38
Pune

Pune : भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद! दुरुस्तीसह भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; वाचा सविस्तर.

Thursday, 12 March 2026, 13:38

Pune News : पुणे ते शिरूर आता फक्त काही मिनिटांत, देशातील सर्वात लांब उड्डाणपूल पुणे-नगर महामार्गावर; 31 किमीचा प्रवास होणार सुखकर

Thursday, 12 March 2026, 13:37

एक माणूस, दोन सरकारी नोकऱ्या; 17 वर्षे दोन जिल्ह्यांतून लाटला ‘डबल’ पगार; महाठगाचा प्रताप ऐकून चक्रावेल डोकं

Thursday, 12 March 2026, 13:29
Next Post
Lonikalbhor

Lonikalbhor : लोणी काळभोर-कदमवाकवस्ती कचरा कोंडीवर तोडगा निघणार? 9 मार्चला प्रशासनाची उच्चस्तरीय बैठक.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.