बापू मुळीक

सासवड: वीर येथील धरणातून पाणीपुरवठा योजनेच्या मध्यवर्ती ठिकाणी काबलवाडी (ता.पुरंदर) येथील पंपगृहावरील रोहित्रा मध्ये बिघाड झाल्याने, संपूर्ण सासवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या परिस्थितीची दखल घेऊन माजी आमदार संजय जगताप यांनी त्वरित पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने रोहित्र दुरुस्त करून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सूचना केल्या.
यासाठी माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवीत पंपग्रहावर जाऊन, तेथील उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या मदतीने, रोहित्र दुरुस्तीच्या कामाला अधिकची गती दिली. त्यांच्या या तत्परतेमुळे व अथक प्रयत्नामुळे काही तासातच रोहित्र दुरुस्त करण्यात आले. रोहित्र दूरस्थ झाल्याने, या ठिकाणचे 180 अश्वशक्तीचे दोन्ही शक्तिशाली पंप पुन्हा सुरू झाले.
त्यामुळे आज संध्याकाळपासून सासवड शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत झाला. अडचणीच्या मार्गातून व सध्या उन्हाळा असल्यामुळे, सासवड करांचे हाल होऊ नये म्हणून, त्वरित कामाला गती देऊन, माजी आमदार संजय जगताप यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे तरी सासवडकरांच्या पाण्याचे हाल होणार नाहीत.
याबाबत मुख्याधिकारी, माजी आमदार व माजी उपनगराध्यक्ष यांनी त्वरित मदत करून, रोहित्र सुरळीत केल्याने, सामान्य नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.







