पुणे: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक (Voter ID) निवडणुकीसाठी गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मुंबईतील ज्या (Pune Mahapalika Nivadnuk) नागरिकांची नावे महानगरपालिका मतदार यादीत आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असून त्यांनी या दिवशी आपला हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

महानगरपालिका मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना घरोघरी मतदार चिठ्ठी वाटप करण्यात येत आहे. या चिठ्ठीवर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे ठिकाण याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानाच्या दिवशी नेमके कोणत्या केंद्रावर जायचे आहे, याची खात्री करून घ्यावी.

मतदानासाठी मतदाराने मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. मात्र जर एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल, तर राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या इतर 11 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे. यामध्ये पासपोर्ट, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, अपंगत्वाचे फोटोसहित प्रमाणपत्र, आरोग्य विमा योजनेचे कार्ड, पेन्शन कार्ड आणि स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना आपला मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेर, स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावा लागणार आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेण्याचा प्रयत्न केल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या कारभारासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील पाच वर्षांचा विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निर्णय घेणारी महापालिका कोणाच्या हातात जाणार, हे या मतदानातून ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.







