Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैकुंठधाम एक स्मशानभुमी; भितीच्या पलिकडे कवठे येमाई दशक्रिया घाट, अंतविधी एकाच ठिकाणी

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 March 2025, 19:13

युनूस तांबोळी

 

शिरूर (पुणे): आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा..असे भजन गाऊन अखेरचा निरोप कोणा मृत व्यक्तीला द्यावा. जळत्या सरणावर आपुल्या आवडत्या व्यक्तीच्या मरणाचा प्रसंग मन हेलावणार असतो. ऐन तारूण्यात मुलाचं निधन, वार्धक्याने आई वडीलांनी मुलाची सोडलेली साथ असो की प्रिय पती पत्नीची झालेली ताटातूट. असे अनेक दुखाःचे प्रसंग फक्त स्मशानभुमीत पहावयास मिळतात. बोटाला धरून आयुष्याचे गणित शिकवणाऱ्या आपुलकिच्या नात्याला जळताना पाहिल्यावर नयन आश्रुंचा बांध फुटतो. पण कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील ग्रामस्थांनी ही स्मशानभुमी वैकुंठधाम पर्यटनासारखी बनवली आहे. येथे येणारे दुखीःजन येथील परीसर पाहिल्यावर स्मशानभुमीत आल्यावर भितीपासून दूर निर्सगाच्या सानिध्यात असल्याचे जाणवत असल्याची चर्चा करतात.

काय अपेक्षित चित्र…

आजही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात वेगवगेळ्या योजनांमधुन विकास साधला जातो. त्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. गाव तिथे स्मशानभुमी यासाठी गावाला निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार संबधीत ग्रामविकास अधिकारी यांनी गावात स्मशानभुमीसाठी निधी देऊन तेथील विकास करण्याचे काम केले आहे. कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे गावात मृत व्यक्तीच्या कुटूंबीयांसाठी अंतविधी व दशक्रिया विधी प्रसंगी वेगवेगळ्या सुवीधा स्मशानभूमीत तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून वैकुंठभुमी रथ तयार करण्यात आला. त्यानुसार मृत व्यक्तीच्या घरी याबाबतच्या सुवीधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सक्रिय होते. यातून गावात होणारे मृत्यूचे प्रमाण आणी त्याची नोंद होऊन गावात नागरिकांना दुख:च्या समयी सुविधा उपलब्ध होते.

जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी…

पुणे जिल्हातील गावांमध्ये स्मशानभुमी बाबत वेगवेगळे चित्र पहावयास मिळते. काही ठिकाणी नुसतेच शेड तर काळवंडलेला पत्रा दिसतो. काही ठिकाणी तर स्मशानभुमीची बिकट अवस्था आहे. काही ठिकाणी प्रेत जायला रस्ता नसल्याने दुखःच्या समई कोणी प्रतिक्रिया देत नसल्याने घुसमट प्रतिक्रिया आहेत. जिल्हा परिषद व पंचाय़त समितीच्या माध्यमातून गावात विकास साधला गेला. वेगवेगळ्या पद्धतीने निधी टाकण्यात आला. मात्र आजही स्मशानभुमी ही भितीदायक दिसू लागल्याचे चित्र आहे.

काय आहे वैकुंठधाम…

कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील वैकुंठभुमीत ग्रामस्थ व पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी जाणीवपुर्वक लक्ष दिले आहे. शासनाचा निधी आणून त्यांनी या ठिकाणी मानवाच्या शेवटच्या अंतविधीसाठी निसर्गाची देखील साथ असावी. यासाठी प्रयत्न केला आहेत. वेगवेगळ्या झाडांची लागवड करून या स्मशानभुमीत सावली निर्माण केली आहे. त्यातून येणारा दुखःजन हा या सावलीत आपले दुखः विसरावा असा उद्देश ठेवला आहे. यासाठी गावातील सरपंच, उपसरंपच, सोसायटी अध्यक्ष तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे या स्मशानभुमीत नेहमी पक्षांचा फेरफटका, रेलचेल पहावयास मिळते.

अंत संस्कारासाठी शेड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
या परिसरात एक पत्र्याचे शेड उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये दशक्रिया विधीच्या वेळी व्याख्यान, प्रवचनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. प्रवचनकार महाराजांसाठी आसनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. सभोतालच्या परिसरात झाडांमुळे काकस्पर्श होण्यास विलंब लागत नसल्याचे बोलले जात आहे. त्या बरोबर आलेल्या श्रोत्यांना उन्हाचा चटका लागत नाही. या ठिकाणी सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे यांनी या वैकुंठधामला आकर्षक कमान तयार करून दिली आहे. येथे रस्ता, विज, पाणी यांची सोय असल्याने रात्रीच्या वेळी देखील येथे अंतसंस्कार केले जातात.

कवठे येमाई येथे स्मशानभुमी ही वैकुंठधाम करण्यासाठी ग्रामस्थांनी नियोजन केले होते. अंतविधी बरोबर दशक्रियाविधी या ठिकाणी व्यवस्थीत पार पडला जावा. असे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून झाडे लावून त्याची जोपासना करण्यात आल्याने येथील परिसर हिरव्यागार झाडांच्या सावलीमुळे आकर्षक झाला आहे. पुढील काळात सर्वधर्म समभाव हा उद्देश समोर ठोवून ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुस्लीम व गोसावी समाजाला देखील कब्रस्थान व दफनभुमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाने याची दखल घ्यावी.

– डॅा. सुभाष पोकळे
                                                                                                                             मा. पंचायत सदस्य शिरूर

कवठे येमाई हे गाव परिसरात अधिक लोकसंख्येचे गाव आहे. त्यानुसार या ठिकाणी सुव्यवस्थीत अशी स्मशानभुमी करण्याचा ग्रामस्थांचा आग्रह होता. त्यामुळे वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून येथे रस्ता, विज, पाणी  उपलब्ध झाले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता ठेवण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली गावातील स्मशानभुमी वैकुंठधाम करण्य़ात आली आहे. विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून स्मशानभुमी आकर्षक करण्याचे काम करण्यात आले आहे. येथील स्मशानभुमीला वैकुंठधाम करून मरणाची भिती लोकांमध्ये कमी करण्याचे काम करण्यात आले आहे.

     – मधुकर रोकडे
                                                                                                        उपसरपंच कवठे येमाई

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

वाकड परिसरात दोन आरएमसी प्लँटवर कायमस्वरुपी बंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.