Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : ‘बिबट्यांचे हल्ले नेमके थांबणार तरी कधी?, उरुळी कांचनच्या नागरिकांचा सवाल ; बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊनही वनविभाग सुस्तच ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 November 2023, 19:49

हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमे वस्ती परिसरात एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी (ता. २२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेळी ठार झाली असून, घटनास्थळी हवेली वनविभागाने पंचनामा केल्याची माहिती वनाधिकारी अशोक गायकवाड यांनी दिली.

उरुळी कांचनपासून जवळ असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मचाले वस्ती परिसरात मागील एक महिन्यापूर्वी बिबट्या धुमाकूळ घालत होता. याठिकाणी असलेली भटकी २ ते ३ कुत्री या बिबट्याने फस्त केली होती. मात्र, मागील एक महिन्यापासून बिबट्याला जेरबंद करण्याचा कोणताही प्रयत्न हवेली वनविभागाने अद्याप केला नाही. वनविभागाचा हा निष्काळजीपणाचा कारभार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठणार का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

उरुळी कांचन शहराजवळ मानवी वस्तीजवळ काही अंतरावर बिबट्या येऊनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मागील एका महिन्यापासून एक पिंजराही वनविभागाला मिळाला नसल्याने वनविभागाला नागरिकांच्या सुरक्षिततेचे देणे-घेणे नसल्याची विदारक परिस्थिती सध्या पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन वळती येथील नागरिक पाहत आहेत.

 

शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने वस्तीवरील २ ते ३ कुत्री फस्त केली असून, या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे सुद्धा दिसून आले होते. जंगलात अन्न, पाण्याच्या कमतरतेमुळे बिबट्यांचा वावर आता गावांजवळ वाढलेला आहे. तरीदेखील वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करत नाही.

पिकांना पाणी देता येत नाही..
शिंदवणेसारख्या डोंगराळ भागाच्या गावात बिबट्या दाखल झाल्याने पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, वळती, तरडे, शिंदवणे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेंढपाळ व पशूपालन करणार्‍यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वास्तव्याने या भागात शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाजवळच उरुळी कांचन शहराची मानवी वस्ती असल्याने वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये ; वनाधिकाऱ्यांचे आवाहन..
याबाबत बोलताना वनाधिकारी अशोक गायकवाड म्हणाले, “ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. शिंदवणे परिसरात बिबट्याच्या दाताचे व्रण दिसून येत आहेत. ते व्रण, पायाचे ठसे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली आहे. दिवसा सदर ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, तसेच नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये. ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
2 Army captains, JCO killed in Jammu and Kashmir encounter

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी, एक जवान शहीद; दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.