पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन वकिलांना अटक केली आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात वकिली करतात. या घटनेने शिवाजी नगर सत्र न्यायालयात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना मोहोळ खून प्रकरणातील अन्य आरोपींसोबत शुक्रवारी रात्री अटक केली आहे.