Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुथडी भरून वेगाने वाहणारी इंद्रायणी..नदीमध्ये अडकून पडलेल्या ३ गायींचा हंबरडा, नागरिकांनी अनुभवला सुटकेचा थरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 26 July 2024, 19:41
three cow rescued from indrayani flood pune

पिंपरी: दुथडी भरून वेगाने वाहणारी इंद्रायणी नदी..नदीमध्ये चहू बाजूंनी वेढलेल्या भू-भागामध्ये अडकून पडलेल्या ३ गायींचा हंबरडा…अशा परिस्थितीत त्या गायींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तब्बल ३ तास चाललेले बचावकार्य…अंगावर शहारा आणि प्राणीमात्रांबद्दल ह्रदयात साठलेला कारुण्यभाव…संपुर्ण प्रकार डोळ्याची पापणी न लवता पाहणारे परिसरातील नागरिक…आणि आपत्कालीन यंत्रणेने अथक परिश्रमाने केलेली गायींची सुखरूप सुटका…हा सर्व प्रकार आज (दि. २६) याची देही याची डोळा पाहणाऱ्या नागरिकांनी अनुभवला.

 

चऱ्होली बुद्रुक येथील इंद्रायणी धाम स्मशानभूमीच्या किनाऱ्याच्या विरूद्ध बाजूला असलेल्या नदीपात्रातील बेटावर गेल्या २ दिवसांपासून ३ गायी अडकून पडल्या होत्या. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी वाढत गेल्याने गायींच्या सुटकेबाबत सर्वजण चिंतीत होते. अशातच महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली. शहरात पूरनियंत्रणासाठी विविध पथके गुरुवारी दिवसभर विविध ठिकाणी मदत आणि बचावकार्यासाठी अहोरात्र काम करत होती. शहरातील आपत्कालीन परिस्थिती पाहता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी संपर्क साधून त्यांना शहरात पाचारण केले. शहरातील विविध ठिकाणी या दलाच्या तुकडीने मदतकार्य करत बचावकार्यात महत्वाची भूमिका बजावली.

आज चऱ्होली येथील नदीपात्रातील बेटावर अडकलेल्या गायींची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मोहीम हाती घेतली. महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. सुमारे तीन तास चाललेल्या या बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक सुसज्ज उपकरणांसह ३ बोटी आणि दोरखंडाच्या सहाय्याने गायींना सुखरूप नदीकाठी आणले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अग्निशमन दलाचे दोन वाहने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसदा दलाची ३ वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.

बचावकार्यामध्ये असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर यांच्या अधिपत्याखाली आणि निरीक्षक हनुमंत नांबा यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफचे २५ जवान, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील १० पोलीस कर्मचारी, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांच्या अधिपत्याखाली मोशी अग्निशमन केंद्राचे ९ जवान व तळवडे अग्निशमन केंद्रांचे १४ जवानांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. या संपुर्ण मोहीमेत लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट फाउंडर विक्रम भोसले आणि टीम, अलंकापुरी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम, बजरंग दल गोरक्षक टीम यांचेही सहकार्य लाभले. गायींचे मालक भानुदास कुंभार यांनी मोहीमेत सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २५ जवानांची तुकडी शहरात दाखल

दरम्यान, आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने आयुक्त शेखर सिंह यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेवून करावयाच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलासह विविध विभागांकडे असलेली उपकरणे आणि साधन सामग्री यामध्ये आणखी कोणत्या अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता असावी याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या २५ जवानांची तुकडी शहरात दाखल झाली असून विविध ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49
Next Post

महायुतीतून लढणार नाही, वेळ पडल्यास महाविकास आघाडीत परतू, अजित दादांच्या आमदार पुत्राने फोडली डरकाळी; कालच जयंत पाटलांनी घेतली होती भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.