Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली मार्गे नगरला जाण्यासाठी नवीन दुहेरी रेल्वेमार्ग होणार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 August 2025, 14:15

लोणी काळभोर : पुणे शहरातील व पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे. आणि पुणे नगर महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. या नव्याने होणाऱ्या रेल्वे मार्गावर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोलीसह एकूण 12 प्रास्ताविक रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत.

पुणे – अहिल्यानगर हा 98 किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे. हा लोहमार्ग पुणे ते अहिल्यानगर या राष्ट्रीय मार्गाला समांतर असणार आहे. महामार्गाला समांतर रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी डीपीआर तयार केला आहे. या रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. कंपनीने सादर केला आहे.या दुहेरी मार्गावर 12 रेल्वे स्टेशन असणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे.

पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आता दौंड रेल्वे स्थानकावरून धावतात. दरम्यान, यात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. शिवाय, वळसा घालून जावे लागते. तर बसने पुण्याहून नगरला तीन ते चार तास लागतात. परंतु, प्रस्तावित रेल्वे मार्गावर गाडी 160 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावेल. त्यामुळे हे अंतर या रेल्वेमुळे निम्मे होऊन दीडतासामध्ये नगरला पोहचता येणार आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढविण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, तळेगाव ते उरुळी आणि पुणे ते अहिल्यानगर अशा दोन नवीन मार्गांवर रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम रेल्वे बोर्डाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळेगाव ते उरुळी हा बाह्यवळण मार्ग करण्याचे नियोजन होते, पण आता तो मार्ग दुहेरी करून तोच तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे. त्याचाही आराखडा कोकण रेल्वेने तयार केला आहे.

 

शिरूर तालुक्यातील सर्वाधिक तर हवेलीतील कमी जमीन जाणार
पुणे ते अहिल्यानगर दरम्यान 98 किलोमिटरचा दुहेरी रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यासाठी सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील जाणार असून, त्यांनतर पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यातील जमीन जाणार आहे. तर सर्वांधिक कमी जमीन ही हवेली तालुक्यातील जाणार आहे.

ही आहेत प्रस्तावित रेल्वे स्थानके
लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित स्थानके आहेत. लोणी काळभोर रेल्वे स्थानकावरून एक नवीन मार्गिका तयार होऊन जंक्शन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर परिसराचा मोठा विकास होऊन नागरिकांना रेल्वेचा फायदा होणार आहे.

तालुक्यांमधील एवढी जमीन जाणार (हेक्टर)
हवेली (6.70 कि. मी.),
शिरूर (38.875 कि. मी.),
अहिल्यानगर (53.145 कि. मी.)
एकूण जमीन : 785.898 हेक्टर

जमिनीचा तपशील
– खासगी जमीन – 727.925
– सरकारी जमीन – 13.016
– वनजमीन – 44.956
एकूण जमीन : 785.898 हेक्टर

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14

शेतकऱ्यांनो PM किसानचा हप्ता येण्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ नवीन बदल तपासा अन्यथा बंद होईल हप्ता; घरबसल्या करा ऑनलाइन अपडेट

Sunday, 4 October 2026, 16:03

पुण्यात नवरा-बायकोचा कारनामा! व्यावसायिकाला जाळ्यात ओढून लावला २ दोन कोटींचा चुना

Sunday, 4 October 2026, 16:01

भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून कौस्तुभ गावडेंना उमेदवारी, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक वारशाचे वारसदार; कौस्तुभ गावडे नेमके कोण?

Sunday, 4 October 2026, 15:51

रायगडावर फिरायला गेला अन् 800 फूट दरीत सापडला मृतदेह; मुंबईच्या तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 4 October 2026, 15:47
Next Post

हिंजवडीत दोन दुचाकीस्वारांमध्ये तुफान राडा; सीसीटीव्ही व्हिडीओ होतोय व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp