अक्षय टेमगिरे
रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी पायी जाणाऱ्या कामगारास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधारामध्ये घेवुन जात मारहाण केली तसेच मोबाईल घेवुन त्यावरुन फोन पे द्वारे एक हजार रुपये घेण्यात आले. तसेच फिर्यादीचे कानातील एअर बड्स सुद्धा जबरदस्तीने काढुन घेण्यात आले. त्यानंतर आरोपी तिथून निघुन गेले होते. सदर प्रकरणी कामगार फिर्यादी मोहम्मद अदिल अन्सारी (सध्या रा. ढोकसांगवी, पाचंगेवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे, मुळ रा. भारतगंज, प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीवरुन दोन अनोळखी इसमांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश कंपन्यांमध्ये तिन शिफ्टमध्ये काम चालत असल्याने रात्रीच्यावेळी देखील कामगारांची ये जा चालु असते. त्याचाच फायदा घेवुन दि. १८ जानेवारी रोजी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास एका कंपनीतील कामगार कंपनीतुन सुटल्यावर पायी चालत घरी ढोकसांगवी, पाचंगेवस्तीकडे जात होता.
त्यावेळी एका हिरो होंडा मोटार सायकलवरून दोन अनोळखी व्यक्तींनी येवून पायी जाणाऱ्या कामगारास कोठे राहतो?वगैरे विचारपुस करत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधारामध्ये घेवुन जात त्याला हाताने मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याचा मोबाईल घेवुन त्यावरुन फोन पेद्वारे एक हजार रुपये घेतले व फिर्यादी यांच्या कानातील एअर बड्स जबरदस्तीने काढुन घेवुन निघुन गेले होते. सदर प्रकरणी कामगार यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने गोपनिय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयातील दोन्ही आरोपीचे नाव, पत्ता निष्पन्न करत आरोपी आकाश निळकंठ हणवते (वय 22 वर्षे, मुळ रा. देवठाणा, ता. पुर्णा, जि.परभणी) नवनाथ भाऊराव कोल्हे (वय 28 वर्षे, मुळ रा. तारला, ता.जि. जालना) यांना ताब्यात घेवून दि. २० जानेवारी रोजी अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपींकडे सखोल तपास केला असता अटक आरोपी देखील एका कंपनीत कामास आहे. ते कामावरुन घरी जात असतांना फिर्यादीस मोटार सायकलवर लिफ्ट देण्याचे बहाण्याने अंधारामध्ये घेवुन जावुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम व एअर बड्स असे १ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल व तसेच ४०हजार हजार रुपये किंमतीची हिरो स्पिलैंडर मोटार सायकल (क्रमांक एम एच २२ बी डी २४०८) असा एकुण ४१ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस रासकर हे करीत आहेत.