Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेलीतील शाळांची गुणवत्ता ढासळली…! शिष्यवृत्ती परीक्षते जिल्ह्यात खालून सहाव्या क्रमांकावर; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 August 2025, 18:22

लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमीक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत शिरूर तालुक्याने बाजी मारली असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा विचार करता हवेली तालुका गुणवत्ता यादीत खालून सहाव्या क्रमांकावर आहे. यावरून हवेली तालुक्यातील शाळांची गुणवत्ता खालावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न उभा राहिला आहे.

हवेली तालुक्यातून प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 4 हजार 425 विद्यार्थ्यांपैकी 807 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यातील अवघ्या 29 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तर 3380 विद्यार्थी हे या परीक्षेत अपात्र ठरले आहेत. पूर्व प्राथमिक (पाचवीच्या) शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत परंपरेप्रमाणे शिरूर, खेड आणि आंबेगाव हे तालुकेच यंदाही अव्वल ठरले आहेत. तर हवेली तालुक्याचा प्राथमिक विभाग शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सपशेल फेल ठरला आहे.

हवेली तालुक्यात माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी सुसज्ज इमारती, सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा, पोषक शैक्षणिक वातावरण असतानाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मागील काही दिवसांपूर्वी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात प्राथमिक विभाग तोंडावर आपटल्याचे चित्र आहे. ही एक दुर्दैवी बाब नसून हवेली तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रातील पिछेहाट मानली जात आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे अपयश नसून, हवेली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पिछेहाट असल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

हवेली तालुका गुणवत्ता यादीत शेवटून सहाव्या क्रमांकावर असल्याचे दिसुन आले. ही बाब हवेली तालुक्यातील राजकारणी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांसाठी लाजिरवाणी आहे. सोशल मीडियापासुन थेट गावातील पारावर राजकारण, अर्थकारणाबरोबरच गप्पा झोडणाऱ्यांनी, राजकारण, अर्थकारणाबरोबरच आपआपल्या गावातील शैक्षणिक प्रगतीवर गप्पा झोडण्याची व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, तेवढ्याच जोमाचे शिक्षक आहेत. मात्र, हवेलीतील शाळांची पिछेहाट का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

गुणवत्ता खालावल्याची कारणे शोधावी लागणार..
हवेली तालुक्यातील 4 हजार 425 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. यातील फक्त 29 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. गुणवत्ता यादीत आलेले बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे असून, काही अपवाद वगळता विद्यालये व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पिछेहाट झाली आहे. दरम्यान, गुणवत्ता इतकी का घसरली, हे शोधावे लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे हवेली तालुक्यातील शिक्षण पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांचे पितळही उघडे पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचे आहे. कारण येणारी पिढीचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे.

शाळेच्या वेळेत शिक्षक भलतीकडेच..
गटशिक्षण अधिकाऱ्यांपासुन थेट जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी देऊन, कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याची गरज असताना अधिकारी मात्र ‘आपले भले व आपले कार्यालय भले’ अशा अवस्थेत काम करत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. कामचुकार शिक्षकांवर कोणतीच कारवाईची केली जात नसल्याने शिक्षक शाळेच्या वेळेत फिरत असल्याचे चित्र हवेली तालुका पाहायला मिळत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

आई नव्हे वैरीण! पोटच्या लेकीला बांधून ठेवून सावत्र मुलाला करायला लावला अत्याचार; धक्कादायक सत्य समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp