Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 27 October 2026, 20:48

पुणे : पुणे जिल्ह्यात वैध बाइक टॅक्सी अ‍ॅग्रिगेटर परवान्याशिवाय रॅपिडो कंपनीकडून सेवा सुरू असल्याचा दावा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केला आहे. याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित बाइक टॅक्सी अ‍ॅप बंद करण्यासाठी पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरटीओने दिली आहे. नागरिकांनी आवश्यक परवानगी मिळेपर्यंत या सेवेचा वापर टाळावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली होती. या बैठकीला आरटीओ अधिकारी, अ‍ॅग्रिगेटर कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रॅपिडोचे संचालन करणाऱ्या मे. रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला वैध ई-बाइक टॅक्सी अ‍ॅग्रिगेटर परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यातील विनापरवाना बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या आदेशानंतरही सेवा सुरू असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

आरटीओच्या म्हणण्यानुसार, निर्देशांचे पालन न करता सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय संबंधित बाइक टॅक्सी अ‍ॅप बंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या मागणीवरून अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.

रॅपिडोच्या अ‍ॅपवर खासगी संवर्गातील दुचाकींची नोंदणी करून त्यांचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित वाहनमालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरटीओने दिला आहे.

त्यामुळे बाइक टॅक्सी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसह या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकीचालकांनीही नियमांची दखल घेणे आवश्यक आहे. वैध परवान्याबाबतची स्थिती स्पष्ट होईपर्यंत रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेचा वापर टाळावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

 

 

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp