Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात पावसाचा हाहाकार..! ‘या’ प्रकारचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारने नुकसान भरपाई द्यावी; शरद पवार

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 23 September 2025, 14:51

पुणे: राज्यात पावसाने जोरदार (Maharashtra Heavy Rain) हजेरी लावत अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेत राज्य सरकारला तातडीच्या मदतीचे आवाहन केले आहे.

 

शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जेथे नेहमी पावसाचे प्रमाण कमी असते, अशा भागांत यंदा प्रचंड अतिवृष्टी झाली. त्याचा थेट परिणाम शेती, गुराढोरांचे पालन आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर झाला आहे.”

या प्रकारच्या नुकसानासाठी मदत…

यावेळी पवारांनी सांगितले की काही बाबींसाठी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. एकतर पिकांच नुकसान, दुसरं गुरंढोरं आणि तिसरं म्हणजे जमीन वाहून गेल्याची. जमीन वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक वर्ष त्या जमिनी नापीक राहतात त्यात कोणतही पिक येत नाही. तसेच मराठवाडा आणि इतर भागातील गुरंढोरं वाहून गेले आहेत. याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही; पवार

पवार पुढे म्हणाले, “या काळात सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ झाली खरी, पण पाच दिवस पाणी वाफ्यात साचल्याने सोयाबीनसह इतर पिकं सडून गेली. त्यामुळे उत्पादन हाती येण्याआधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आम्ही दुष्काळ अनुभवला आहे, पण अशा प्रकारची अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही.”

सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि दक्षिण नगर हे जिल्हे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बाधित झाले असून, या भागांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी पवार यांनी केली.

तातडीने नुकसानभरपाई द्यावी…

शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकारकडे नैसर्गिक आपत्तींमधील मदतीसाठी योजना आहे, त्याची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत केली जाते. त्यामुळे आता तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जावी.”

 शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामे करा

शरद पवारांनी शासनाकडे विशेष आग्रहाने सांगितले की, “पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि त्यानंतर तातडीची तसेच दीर्घकालीन मदत देण्यात यावी.”

अखेर, “ही परिस्थिती अभूतपूर्व आहे, त्यामुळे राज्य सरकारने केवळ औपचारिकतेपुरती मदत न करता गंभीरपणे निर्णय घ्यावेत,” अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post
Cabinet Meeting: Big decision in the cabinet meeting; Announcement of Rs 2100 crore aid, know the details...

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे अतिमहत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.