Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या खिशाला कात्री; नव्या वर्षात ओला-उबरचा प्रवास महागला!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 4 January 2024, 11:44

पुणे : शहरात आता ओला, उबरमधून प्रवास महागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे वाढीला मंजुरी देण्यात आली. वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. त्यानंतर आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये लागणार आहेत तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दर द्यावे लागणार आहे. एक जानेवारीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.

वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हे नवीन दर आता लागू झाले असून ओला, उबरसह इतर वातानुकूलित टॅक्सीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर मागील वर्षी १७ एप्रिलला पहिल्या दीड किलोमीटरला ३१ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरला २१ रुपये करण्यात आला होता. त्या वेळी सीएनजीचा दर हा ८६ रुपये किलो होता. सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीचा एप्रिलमधील दर बदलण्यात आलेला नाही. खटुआ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा वातानुकूलित कॅबला २० टक्के दरवाढ करण्याची शिफारस केलेली आहे. या शिफारशीनुसार वातानुकूलित टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये करण्यात आला आहे.

मागील महिन्यात आरटीओत टॅक्सी, रिक्षाचालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरातील वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर सर्वांना सहमती दर्शवली होती. त्यानंतर हा प्रस्ताव आरटीओकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. अखेर यावर प्राधिकरणाकडून शिक्कामोर्तब झाल्याने हे नवीन दर लागू झाले आहेत.

प्राधिकारणाच्या बैठकीत प्रवाशांच्या हितासाठी नवीन नियम तयार करण्यात आले. त्यानुसार शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांकडून भाडे घेताना ते प्रमाणित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची लूट होते. त्याला लगाम बसणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47

Maharashtra Weather: सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान बदलणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:40

Daily Horoscope: 17 नोव्हेंबरला सूर्य-मंगळाचा मोठा योग! या 5 राशींना मिळणार धनलाभ, नोकरीत बढती; वाचा आजचे राशिभविष्य

Tuesday, 17 November 2026, 7:33

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05
Next Post

स्कुटीच्या व्हिलच्या रंगावरून अट्टल घरफोड्या गजाआड; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp