Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत रोहित्र चोरांचा सुळसुळाट; 6 महिन्यात 39 रोहित्र चोरीला

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 12 February 2025, 17:44

उरुळी कांचन, ता. 12 : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मागील 6 महिन्यात 39 रोहित्र चोरी झाली असल्याची खात्रीशीर माहिती “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागली आहे. या माहितीला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दुजोराही दिला आहे.

 

मागील अनेक दिवसांपासून नदीच्या पट्यातील कोरेगाव मूळ, बिवरी, थेऊरसह परिसरातील गावांमधून रोहित्रांची चोरी सातत्याने होत आहे. अनेक गावांतील निर्मणुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती परिसरातील विद्युत रोहित्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तांब्याचे वाढते भाव यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासन शोध घेत नाही की दुर्लक्ष करीत आहे अशी शंका परिसरातील नागरिकांच्या मनात येत आहे.

चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलीस खात्यास माहीत नाही का? अशी चर्चा नागरिक आपसात करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलीस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास पाणी न मिळाल्याने शेत मालाचे नुकसान होते.  पिण्याच्या पाण्याची गैरसोय अशा आपत्तींना तोंड द्यावे लागते. रोहित्रांच्या चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस तपास यंत्रणाने लवकरात चोरट्यांचे रॅकेट पकडावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, चालू विद्युत प्रवाह बंद करणे, प्रचंड वजनाचे विद्युत रोहित्र खाली घेणे, त्यातील तांब्याच्या तारा चोरणे व काही मिनिटांच्या आतच पोबारा करणे या करिता विद्युत रोहित्र फोडण्यासाठी सुसज्ज यंत्रणेसह पाच ते सहा जणांची टोळीच कार्यरत असल्याचा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनी अशा चोरट्यांच्या तातडीने मुसक्या आवळण्याची गरज आहे.

तांबे 700 रुपये किलो, त्यामुळे वाढल्या चोऱ्या

चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे 600 ते 700 रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले  आहे. असेही ग्रामीण भागातील काही नागरिकांचे म्हणणे आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे 100 ते 120 किलो तांबे असते आणि त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे 70 ते 80 हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑईलची पण विक्री केली जाते.

6 महिन्यात सुमारे 39 विद्युत रोहित्र चोरीला

गेल्या 6 महिन्यात सुमारे 39 विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणाऱ्या विद्युत रोहित्राच्या जागी नवीन जनित्र बसविण्यास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते.

रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना होतच रहाणार आहेत. सापडलेल्या अशा टोळ्यांवर शासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमदार रोहित्र बदलून देत आहेत. मात्र चोरीच्या घटनाही होत आहेत. त्यामुळे रोहित्र चोर पोलिसांनी गस्त वाढवून पकडावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
 संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Next Post

नैसर्गिक प्रसुतीसाठी महिलांनी बर्थ कॅम्पेनियनचा आधार घ्यावा: डॉ.अशोक काळे (नैसर्गिक प्रसुती तज्ञ)

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.