Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवीन मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडा – पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची मागणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 December 2022, 13:24

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील ६६ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे “धरण आहे उशाला आणि कोरड पडली घशाला” अशी परिस्थिती सध्या नवीन मुळा- मुठा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेले शेतकरी व नागरिक करू लागले आहेत.

त्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार असल्याने याचा फटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचनसह दौंड तालुक्यातील काही गावांना व येथील शेतकऱ्यांना बसणार आहे.

पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील दौंड, इंदापूर व हवेली या तिन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी व शेतीला वापरासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडले जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कालव्याला पाणी नसल्याने तिन्ही तालुक्यातील शेतकरी व नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

 

खडकवासला धरणातून नवीन मुठा कालव्यातून शेतीच्या आवर्तनात घट होत चालली आहे अशावेळी हवेली व दौड तालुक्यांना बेबी कालवा वरदान ठरू लागला आहे.

हवेलीतील नर्सरी उद्योग, फुलशेती तर दौंड तालुक्यातील ऊसशेतीला मोठा लाभ बेबी कालव्याने झाला आहे. सध्या कालव्याचे मांजरी ते लोणी काळभोरपर्यंत अस्तरीकरणाचे काम चालू आहे. परंतु, कामाला संथगती असल्याने ६ महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने आवर्तन बंद झाल्याचा फटका पूर्व हवेलीतील नागरिकांना व नर्सरी व्यावसायिक व शेतकऱ्यांना बसला आहे.

खडकवासला नवीन मुठा कालव्यातून आवर्तन बंद राहिल्याने शेतीचा पाणी प्रश्न निर्माण होऊ लागला आहे, अशातच कालव्यावरच पूर्व हवेलीतील फुरसुंगी, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या मोठ्या गावांचा पिण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने पिण्याची समस्या उभी राहू लागली आहे. कालव्यालगत छोट्या गावांचे पिण्याचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे आवर्तनाचा फटका शेती व नागरी लोकसंख्येला बसला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात इंदापूर तालुका वगळता अन्यत्र पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या मध्यावरच प्रामुख्याने हवेली व दौंड तालुक्यातील विहिरी व कूपनलिकांत पाणी कमी झाले आहे. त्यातच खडकवासला धरण प्रकल्पात पाणी वाटपाचे नियोजन नसल्याने ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या महिन्यात बंद झालेले शेतीचे आवर्तन अद्याप बंद असल्याने शेतीला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.

खडकवासला नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बैठक पार पडली असून येणाऱ्या २६ तारखेला मुळा-मुठा उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
विजय पाटील, अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग

बेबी कालव्याचे अस्तरीकरनाचे काम सुरू असल्याने पाणी बंद केले आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कमी झालेत. बेबी कालव्याला पाणी नसल्याने उरुळी कांचनसारख्या मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडावे.

संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, (ता. हवेली)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

पिंपरी- चिंचवडच्या सहआयुक्तपदी मनोज लोहिया यांची नियुक्ती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp