प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune : युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी खोपोली (रायगड) येथील नगरसेविका यांचे पती मंगेश काळोखे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. आदर्शनगर, उरळी देवाची, पुणे) याला अटक केली आहे. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशनकडील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता. (Pune)

पोलिस अंमलदार नासीर देशमुख यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार आरोपी आळंदी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने विश्रांतवाडी–आळंदी भागात सापळा रचून विश्रांतवाडी पीएमटी बस स्टॉप येथून आरोपीस ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचा खोपोली (रायगड) येथील खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध खोपोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. नं. ३६६ भा.न्या.सं. कलम १०३(१), ६१(२), १८९(१), १८९(४), १९०, १९१(३) अन्वये गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार व युनिट-५ च्या पथकाने केली.







