Wednesday, March 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : प्रवाशांनो लक्ष द्या! ‘मिसिंग लिंक’ सुरू होणार, पण ‘या’ गाड्यांना मिळणार नाही प्रवेश. वाचा नेमकं काय आहे कारण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 9:07
Pune

photo- social media

Pune : पुणे-मुंबई प्रवासातील कायमची कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत राज्य सरकारने अधिक सावध पवित्रा घेतला आहे. पहिल्या टप्प्यात या नव्या मार्गावर केवळ हलक्या वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या जड वाहनांना सध्या तरी परवानगी देण्यात येणार नाही. हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या विचाराधीन असून, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

सध्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वर होणारी वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी नित्याचीच समस्या बनली आहे. विशेषतः ज्वलनशील पदार्थांचे टँकर बंद पडले, अपघातग्रस्त झाले किंवा उलटले, तर संपूर्ण महामार्ग तासन्‌तास ठप्प होतो. काही आठवड्यांपूर्वी प्रोपिलीनचा एक टँकर उलटल्यानंतर तो हटवण्यासाठी तब्बल 30 ते 32 तास लागले होते. या काळात हजारो वाहनचालक आणि प्रवाशांना अक्षरशः महामार्गावर अडकून राहावे लागले. या घटनेनंतर महामार्गाच्या नियोजनावर तीव्र टीका झाली होती.

याच पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’वर अशीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी MSRDC ने आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मेपासून हा मार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. मात्र, सुरुवातीचे किमान 6 महिने हा मार्ग हलक्या वाहनांसाठीच खुला ठेवण्याचा प्रस्ताव आहे. कार, जीप आणि खासगी प्रवासी वाहने यांनाच प्राधान्य दिले जाणार असून, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे टँकर किंवा जड वाहने या टप्प्यात वर्ज्य असतील.

या निर्णयामागे काही सामाजिक संस्था आणि मान्यवरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली विनंतीही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. “नव्या मार्गाचा आनंद प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊ द्या,” अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर या संदर्भातील सूचना MSRDC अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

पहिल्या 6 महिन्यांत या मार्गावरील वाहतुकीचा ताण, प्रवाशांचे अनुभव, संभाव्य अडथळे आणि सुरक्षिततेचे मुद्दे यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. एप्रिल महिन्यात या मार्गावर चाचणी धावण्या घेतल्या जाणार असून, त्यानंतर मे महिन्यात अधिकृत उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मात्र, काही तांत्रिक कामांमुळे 1 मेचा मुहूर्त थोडा पुढे ढकलला जाण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी सूचकपणे व्यक्त केली आहे.

एकंदरीत, ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प केवळ अंतर कमी करणारा नसून, योग्य नियोजन केल्यास तो पुणे- मुंबई प्रवासातील ताण आणि अपघातांचा धोका कमी करणारा ठरू शकतो. आणि म्हणूनच सुरुवातीची ही खबरदारी महत्त्वाची मानली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

PMPML

PMPML : विठू नामाचा गजर अन् सुसाट प्रवास! तुकाराम बीजेनिमित्त पुणे-पिंपरीतून देहूसाठी जादा बसेसचे नियोजन.

Wednesday, 4 March 2026, 11:18
Agriculture News

Agriculture News : जमीन खरेदी-विक्रीपूर्वी सावधान! ‘भोगवटादार वर्ग-२’ कडे दुर्लक्ष पडेल महागात; नजराणा शुल्काचे काय आहेत नियम?

Wednesday, 4 March 2026, 10:56

पुण्यात अजब घटस्फोट! पत्नीनेच पतीला दिली ‘पोटगी’; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 4 March 2026, 10:36

सोनं खरेदी करायची योग्य वेळ आली? ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

Wednesday, 4 March 2026, 9:58

Pune News: आभासी नफा, खरा तोटा! पुण्यात ज्येष्ठ वकिलाची 14.25 कोटींची फसवणूक

Wednesday, 4 March 2026, 9:46
Pune

Pune : चंद्रग्रहणात गरोदर महिलेने भाजी चिरली आणि कात्री चालवली… मग पुढे काय झालं? महिलेच्या ‘ही’ कृती पाहून डोळे उघडतील.

Wednesday, 4 March 2026, 9:29
Next Post
Pune

Pune : चंद्रग्रहणात गरोदर महिलेने भाजी चिरली आणि कात्री चालवली... मग पुढे काय झालं? महिलेच्या 'ही' कृती पाहून डोळे उघडतील.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.