पुणे : गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे लाचखोरीची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. याचदरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. पुणे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल खात्यानंतर आता पोलिस विभाग सर्वाधिक लाचखोर ठरत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून समोर आले आहे. या कारवाया १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यानच्या आहेत.

पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरणात नोंदवले गेले आहेत. यामध्ये पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागात सर्वाधिक ६ कारवाया, तर पोलिस विभागात ५ कारवाया केल्या गेल्या आहेत.
कोणत्या विभागता किती प्रकरणं?
महसूल विभाग – 6, पोलिस विभाग – 5, जिल्हा परिषद – 3, आरोग्य विभाग – 2, महापालिका विभाग – 2, वन विभाग – 1, नगररचना विभाग – 1, वस्तू सेवा कर (GST) – 1, कृषी विभाग – 1.
दरम्यान, पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणांची अडवणूक करून एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून 28 हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार समोर नुकताच समोर आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. अशी प्रकरणं सातत्याने समोर येत असून ही परिस्थितीत चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.







