पुणे: पुणे शहरातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची (Pune News) आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पुणे शहर पोलीस व पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांची सुरक्षा विषयक उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी (ता. 21 ) पार पडली. (Breaking News)

या बैठकीस पुणे शहर पोलिस आयुक्त यानी अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय लांडे, ज्ञानेश्वर वाल्हेकर, धनंजय शितोळे, काकासाहेब झांबरे, कालीदास मोरे, भाग्येंद्र चुडासमा, नरेंद्र रूपारेल व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या वाढत्या हिंसात्मक घटनांवर व धमकीच्या प्रकारांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. असोसिएशनने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षपणे भेडसावणाऱ्या समस्या, अलीकडील मारहाण, धमक्या व कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या घटनांचे परिणाम यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. ग्राहक व कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे असोसिएशनने बैठकीत स्पष्टपणे मांडले.
यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेट्रोल पंप परिसर व कर्मचाऱ्यांची 24 x7 सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस निर्देश दिले, कारण पेट्रोल पंपांमध्ये अत्यावश्यक व ज्वलनशील पदार्थ साठवले जातात जे शहराच्या वाहतुकीसाठी व आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर व त्वरित कारवाई करण्याची हमी दिली.
दरम्यान, पुणे शहर पोलीस दलाची ही संवेदनशील व वेगवान दखल पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे कडून मनापासून कौतुकास्पद आहे. समन्वय वाढवून प्रभावी पोलिसींगमुळे अशा घटना कडक पद्धतीने आटोक्यात आणल्या जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आल
“आमचे डीलर्स व कर्मचारी 24 तास पुणे शहराची सेवा करतात आणि शहर चालू ठेवण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. पुणे पोलिसांकडून आज व्यक्त केलेल्या दृढ भूमिकेमुळे सुरक्षा कोणत्याही परिस्थितीत तडजोडीची राहणार नाही याबाबत मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.”
— ध्रुव रूपारेल, (अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन,पुणे.)






