Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरमधील ‘श्री फिटनेस’ जिममध्ये गाणे बदलल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; डंबेल व लोखंडी रॉडने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 July 2026, 17:02

हडपसर, ता. ८ : जिममध्ये सुरू असलेले गाणे बदलल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर डंबेल, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर येथील सातववाडी परिसरातील ‘श्री फिटनेस’ जिममध्ये ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सूरज मुसळे, राज (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) आणि त्यांचा आणखी एक अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुद्दसर रफिक सय्यद (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुद्दसर सय्यद हे गेल्या वर्षभरापासून श्री फिटनेस जिमचे सदस्य असून, नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गेले होते. व्यायाम करत असताना त्यांनी जिममध्ये सुरू असलेले गाणे बदलून दुसरे गाणे लावले. याच कारणावरून जिममध्ये व्यायाम करणारा सूरज मुसळे याने संताप व्यक्त करत शिवीगाळ सुरू केली.

फिर्यादीने याबाबत जाब विचारताच सूरज मुसळे याने “मी कोण आहे, तुला माहिती आहे का?” अशी दमदाटी करत त्यांच्यावर धावून गेला. त्यानंतर त्याचा साथीदार राज तसेच आणखी एक साथीदारही तेथे आला. तिघांनी मिळून मुद्दसर सय्यद यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सूरज मुसळे याने जिममधील लोखंडी डंबेल थेट फिर्यादीच्या डोक्यात फेकून मारला, त्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर राज आणि त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी रॉडने डाव्या खांद्यावर आणि उजव्या पायाजवळ वार केला आहे.जिममधील इतर सदस्य मदतीला धावून आल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

 

जखमी मुद्दसर सय्यद यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने वैद्यवाडी येथील साई क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सूरज मुसळे, राज आणि त्यांचा आणखी एक अज्ञात साथीदार यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बदल्यांचा ‘महा-धडाका’ सुरूच! ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Wednesday, 8 July 2026, 22:58

उंड्रीत स्पार्कलिंग लाईट तयार करताना स्फोट; ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

Wednesday, 8 July 2026, 22:15

विमाननगरमध्ये हायप्रोफाईल स्पावर छापा! अल्पवयीन मुलीसह ३ महिलांची सुटका; स्पा मॅनेजर अटकेत

Wednesday, 8 July 2026, 21:28

शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी! डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद; १८ गुन्हे उघड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 8 July 2026, 20:35

पुणे-मुंबई प्रवास आजही ठप्प! रेल्वे मार्गाची दुरुस्ती अपूर्ण, बुधवारीही गाड्या रद्दच; प्रवाशांची धावपळ कायम

Wednesday, 8 July 2026, 20:28

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे ग्रामपंचायत प्रशासकांना आदेश

Wednesday, 8 July 2026, 20:10
Next Post

शिवगंगा पुलावरील जीवघेणे खड्डे; ब्रिटिशकालीन पुलाच्या पुनर्बांधणीची नागरिकांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.