Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई प्रवास आजही ठप्प! रेल्वे मार्गाची दुरुस्ती अपूर्ण, बुधवारीही गाड्या रद्दच; प्रवाशांची धावपळ कायम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 July 2026, 20:28

पुणे: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील ठाकूरवाडी आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक गाड्यांवर परिणाम झाला असून, रेल्वे प्रशासनाने बुधवारीही पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्णपणे सुरळीत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुसळधार पावसामुळे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर रेल्वे मार्ग बाधित झाला. त्यामुळे मंगळवारी एकूण १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १३ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. याशिवाय आठ गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-सोलापूर, भुज-पुणे आणि सातारा-दादर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस सीएसएमटी ते खडकी दरम्यान रद्द करण्यात आली होती, तर पुढे ती खडकी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार रवाना करण्यात आली.

 

रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे पुणे आणि मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दक्षिण भारत, गुजरात, मराठवाडा आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या परिस्थितीचा परिणाम झाला.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुणे-मुंबई एसटी बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. मंगळवारी पुणे विभागातून सुमारे १२० बस मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. तसेच नाशिक मार्गावरील बससेवाही पूर्ववत करण्यात आली असून नियोजित वेळापत्रकानुसार गाड्या सुरू आहेत.

प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रद्द झालेल्या प्रवासासाठी तिकीट परताव्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. एका दिवसात सुमारे ७९ हजार ७४७ प्रवाशांना ५.९१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. यापैकी पुणे विभागातील २० हजार ९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपयांचा परतावा मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बदल्यांचा ‘महा-धडाका’ सुरूच! ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Wednesday, 8 July 2026, 22:58

उंड्रीत स्पार्कलिंग लाईट तयार करताना स्फोट; ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

Wednesday, 8 July 2026, 22:15

विमाननगरमध्ये हायप्रोफाईल स्पावर छापा! अल्पवयीन मुलीसह ३ महिलांची सुटका; स्पा मॅनेजर अटकेत

Wednesday, 8 July 2026, 21:28

शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी! डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद; १८ गुन्हे उघड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 8 July 2026, 20:35

पुणे-मुंबई प्रवास आजही ठप्प! रेल्वे मार्गाची दुरुस्ती अपूर्ण, बुधवारीही गाड्या रद्दच; प्रवाशांची धावपळ कायम

Wednesday, 8 July 2026, 20:28

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे ग्रामपंचायत प्रशासकांना आदेश

Wednesday, 8 July 2026, 20:10
Next Post

शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी! डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद; १८ गुन्हे उघड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.