यवत: यवत गावाच्या हद्दीतील यवत कुदळेवस्ती – खुटवड वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

यवत गावच्या वार्ड क्रमांक ५ मध्ये असलेल्या खडकवासला कालव्याशेजारी असलेल्या कुदळे वस्ती – खुटवड वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापूर्वी जिल्हा परिषद माध्यमातुन दुरुस्ती करण्यात आली परंतु नव्याने गटार लाईन करण्यासाठी हा रस्ता खांदून त्या ठिकाणी गटार लाईन टाकण्यात आली परंतु गटार होऊनही रस्ता सुस्थितीत झाला नसल्याने रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे तर काही ठिकाणी गटारीचे चेंबरवर आले असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०१७ मध्ये रस्ता करण्यात आला होता परंतु नव्याने गटार लाईनचे काम झाल्याने रस्ता काही ठिकाणी खराब झाला असून सदर रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा चालू आहे.
– गणेश कदम (माजी जिल्हा परिषद सदस्य)







