Sunday, July 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळसदेव हत्याकांडाचा निकाल; आरोपीला जन्मठेप, एक लाखांचा दंड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 19:06

आदित्य बोराटे

इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष तसेच पळसनाथ शिक्षणसंस्थेचे संस्थापक प्रकाश भगवानराव काळे यांच्या हत्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संदीपान विष्णू पोटे (वय ७६, रा. पळसदेव, ता. इंदापूर) याला जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम मृत प्रकाश काळे यांच्या वारसांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून, दंड न भरल्यास आरोपीला एक वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी दिला.

न्यायालयीन निवेदनानुसार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पळसदेव येथील मेन रोडवर ही घटना घडली होती. प्रकाश काळे हे संजय मेडिकलसमोरील कट्ट्यावर बसले असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी संदीपान पोटे तेथे आला. त्याने तलवारीने प्रकाश काळे यांच्या डोक्यावर, तोंडावर, गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश काळे यांना प्रथम इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अकलूज येथे उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी विक्रमसिंह विजयकुमार काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. व्ही. गोमारे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जी. जोशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी ११ साक्षीदारांची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावत ही रक्कम मृत प्रकाश काळे यांच्या वारसांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

या खटल्याच्या कामकाजात इंदापूर न्यायालयातील पैरवी अधिकारी पी.एस.आ गोरख कसपटे तसेच महिला पोलिस हवालदार स्मिता पारेकर यांनी सहकार्य केले.

गेल्या सात वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या गाजलेल्या हत्याकांडाचा अखेर निकाल लागल्याने तालुक्यात या निर्णयाची चर्चा सुरू असून, प्रत्यक्षदर्शी साक्षी आणि भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनील मोरेंचं खोटं उघड!कार नदीत टाकण्याआधी मुलांसोबत काय घडलं? पोस्टमार्टम रिपोर्टचा धक्कादायक खुलासा..

Saturday, 18 July 2026, 23:06

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Saturday, 18 July 2026, 22:37

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Saturday, 18 July 2026, 22:18

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, सोमवारी पुण्यात अंत्यसंस्कार

Saturday, 18 July 2026, 21:55

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! 6 बंडखोर खासदार अधिकृतपणे गटात, ठाकरे गटाला धक्का

Saturday, 18 July 2026, 21:12

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

Saturday, 18 July 2026, 20:41
Next Post

सिया-चेतनला कोर्टाचा मोठा झटका! 90 दिवस जामीन नाही,न्यायालयाचा कडक निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.