उरुळी कांचन: उरुळी कांचन ग्रामपंचायतीने (Uruli Kanchan News) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत निवासी मालमत्ता व अन्य थकबाकी (Pune News) करावर 50 टक्के सवलत देण्याचा ठराव मंजूर केला आहे. उरुळी कांचन ग्रामस्थांच्या उपस्थतीतीत गोंधळात हा ठराव मंजूर करण्यात आला. (Latest Marathi News)

शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना थकित निवासी मालमत्ता करधारकांना थकित रकमेत 50 टक्के सवलत द्यायची की नाही याचे सर्वस्वी अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सोमवारी (ता. 29) उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायतीला 50 टक्के सवलत ठराव मंजूर करण्याची मागणी केली.
ही सवलत केवळ निवासी मालमत्ताधारक यांनाच मिळणार असून, औदयोगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्ता करीता नाही. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत लागू असून 1 एप्रिल 2025 च्या पूर्वीच्या थकबाकीदारांना या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. अशीही माहिती ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी दिली. तसेच यासाठी सन 2025-26 चा मालमत्ता कर हा एकरकमी भरावा लागणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात







