उरुळीकांचन : पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘द लेजेंड्स बार’चे शटर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. हि घटना बुधवारी (ता. 19) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (pune latest crime news)

अज्ञात चोरटे कटावणीच्या सहाय्याने फोडतानाचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान उरुळी कांचन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत महामार्गाच्या शेजारीच निखिल चौधरी यांच्या मालकीचे द लेजेंड्स बार नावाने हॉटेल व बार आहे. मंगळवारी (ता. 18) संध्याकाळी हॉटेल बंद करून घरी गेले होते. त्यावेळी हॉटेलवर असलेले कामगार एका खोलीत झोपले होते.
हेही वाचा: अजित पवारांचा थेट ‘सर्जिकल स्ट्राइक’! भोरमध्ये महायुतीत कुस्ती; काय घडलं?
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तीन इसम हे द लेजेंड्स बार असलेल्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी पाहणी करून एकाने कटावणीच्या सहाय्याने शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर उघडले नाही. यावेळी शटर उघडत नसल्याने दोघांनी मिळून शटर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही शटर उघडले नाही.
पहा Video:
दरम्यान, यावेळी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या गोडावूनला एक मालवाहू ट्रक हा माल घेऊन आला होता. यावेळी या चोरांपैकी एकजनाने त्या चालकाकडे का थांबला याची माहिती घेतली. यावेळी त्या चालकाने गाडीतील माल हा या ठिकाणी असलेल्या गोडावूनला खाली करायचे असल्याचे सांगितले. हे ऐकताच सदर चोरट्यांनी त्या ठिकाणी धुम ठोकली. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसले तरी ट्रकचालकामुळे मोठी चोरीची घटना घडली नाही.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेत वाढ..
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यानी धुमाकूळ घालत चोरीच्या घटना केल्याने नागरिक चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. यामध्ये चोरट्यांनी कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात सोमवारी (ता. 10) अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीतील चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान बनले असताना पुन्हा एकदा चोरट्यांनी बुधवारी (ता. 19) पहाटेच्या सुमारास हॉटेल फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा: बिबट्या आला रे..! बिबट्या थेट घरात घुसला; वनविभागाकडून रेस्क्यू सुरु…






