Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे येथे गावठी पिस्तुलसह दोघेजण जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; उरुळी कांचन पोलीस मात्र अनभिज्ञ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 March 2026, 17:18

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीत (Uruli Kanchan News) बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. गुरुवारी (ता. 26) रात्री साडेनाऊ वाजण्याच्या सुमारास काळेशिवार कॅनोल रोड परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे.

 

रियाज हुसेन मुलाणी (वय-30 रा. बगाडे मळा, उरुळी कांचन) व इक्बाल शमिम खान (वय-31, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस या हालचालींबाबत अनभिज्ञ असल्याने उरुळी कांचन पोलीस नेमके करतात काय असा प्रश्न या निमित्ताने नागीरीकानी उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 26) रात्री साडेनाऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश नागरगोजे आणि त्यांचे पथक शिंदवणे परिसरात गस्तीवर होते. यावेळी काळेशिवार येथील कॅनॉल रोडवर दोन संशयित तरुण दुचाकीवरून जात असताना पोलिसांना आढळले. पथकाने शिताफीने त्यांना अडवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल आणि पितळी धातूची दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

त्यांचाकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. त्यांच्या अंगाची झाडाझडती घेतली असता 50 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे, 50 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी, ॲपल आणि सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 आणि भारतीय न्याय संहिता कलम (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष?
उरुळी कांचन आणि परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढले असताना स्थानिक पोलिसांना या शस्त्रांची आणि गुन्हेगारांच्या हालचालींची पुसटशीही कल्पना नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गावात येऊन ही कारवाई केल्याने, उरुळी कांचन पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या ‘गुप्तचार’ आणि गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बापरे! नाशिकमध्ये पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 10:43

ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? इराण युद्ध आलं अंगलट; व्हाईट हाऊसमध्ये मोठी उलथापालथ!

Sunday, 5 April 2026, 10:02

बँकॉकहून पुण्यात आला अन् विमानतळावरच फसला! 33 लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तस्कर गजाआड

Sunday, 5 April 2026, 9:50

Pune News: आईने कूस बदलली अन् 8 वर्षीय मैराबीचा रक्ताने माखलेला दिसला मृतदेह; शेजारीच झोपलेल्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:38

धुरंधर बनायच्या नादात होत्याचं नव्हतं झालं! धुरंधर 2 चा शो संपला अन् अचानक तलवारीने सपासप वार; गँगवारमध्ये तिघांची निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:10

Pune News: पांढरे केस अन् चेहऱ्यावर शांतता! 68 वर्षीय आजोबांच्या खिशात हात घालताच पोलिसांना फुटला घाम! पाहा काय होतं त्या पिशवीत? वाचा

Sunday, 5 April 2026, 8:47
Next Post

हवेली तालुक्यातील नादुरुस्त हातपंपांना मिळणार नवे जीवन; सभापती युवराज काकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.