Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुक्यातील नादुरुस्त हातपंपांना मिळणार नवे जीवन; सभापती युवराज काकडे

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 March 2026, 17:25

लोणी काळभोर, ता. 27 : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हवेली तालुक्यातील गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहेत. अशी माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली आहे.

 

तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी घसरल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही ठिकाणी हातपंपांचे पाणी आटले असले तरी अनेक ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असूनही हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षे देखभाल न झाल्यामुळे अनेक हातपंप गंजून निकामी झाले आहेत.

या परिस्थितीची दखल घेत हवेली पंचायत समितीच्या वतीने बंद पडलेल्या हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तालुक्यातील सर्व गावांतील व वाड्या-वस्त्यांवरील बंद हातपंपांची यादी संकलित करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

सभापती युवराज काकडे यांनी ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “ज्या ठिकाणी हातपंपांमध्ये पाणी असूनही ते केवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत, अशा हातपंपांची माहिती त्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे द्यावी. प्राप्त यादीच्या आधारे प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येईल.”

गेल्या काही वर्षांत वाड्या-वस्त्यांवर टप्प्याटप्प्याने विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले होते. सुरुवातीला हे हातपंप गावांसाठी मोठा आधार ठरले; मात्र कालांतराने देखभाल अभावी अनेक हातपंप बंद पडले. आता या सर्व हातपंपांना पुन्हा कार्यान्वित करण्यावर पंचायत समितीने भर दिला आहे.

पाणीटंचाईतून गावांना मिळणार दिलासा
हातपंप सुरू झाल्यास टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होण्यापूर्वीच ही मोहीम पूर्ण करण्याचा पंचायत समितीचा प्रयत्न असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, बंद हातपंप पुन्हा सुरू होण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बापरे! नाशिकमध्ये पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 10:43

ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? इराण युद्ध आलं अंगलट; व्हाईट हाऊसमध्ये मोठी उलथापालथ!

Sunday, 5 April 2026, 10:02

बँकॉकहून पुण्यात आला अन् विमानतळावरच फसला! 33 लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तस्कर गजाआड

Sunday, 5 April 2026, 9:50

Pune News: आईने कूस बदलली अन् 8 वर्षीय मैराबीचा रक्ताने माखलेला दिसला मृतदेह; शेजारीच झोपलेल्या चिमुरडीसोबत नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:38

धुरंधर बनायच्या नादात होत्याचं नव्हतं झालं! धुरंधर 2 चा शो संपला अन् अचानक तलवारीने सपासप वार; गँगवारमध्ये तिघांची निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 9:10

Pune News: पांढरे केस अन् चेहऱ्यावर शांतता! 68 वर्षीय आजोबांच्या खिशात हात घालताच पोलिसांना फुटला घाम! पाहा काय होतं त्या पिशवीत? वाचा

Sunday, 5 April 2026, 8:47
Next Post

इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.