Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद ॲकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन ‘तेजोमय चैतन्य उत्सव’ दिमाखात संपन्न 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 26 December 2025, 17:34

उरुळी कांचन, ता. 26: येथील नामांकित सीबीएसई शाळा स्वामी विवेकानंद ॲकॅडमी येथे वार्षिक स्नेहसंमेलन “तेजोमय चैतन्य उत्सव” मोठ्या उत्साहात आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली वातावरणात पार पडले. “नवरत्न-नऊ पवित्र रत्ने आणि मानवी जीवनाशी त्यांचा गुणात्मक संबंध” ही यंदाच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. हा भव्य सोहळा बुधवारी (ता. 24) शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे साहेबराव कांचन उपस्थित होते. (Swami Vivekananda Academy in Uruli Kanchan)

साहेबराव कांचन यांनी मार्गदर्शन करताना, “आजच्या पिढीला तंत्रज्ञानासोबत शिस्त, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे बळ देणे अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. यावेळी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश (तात्या) कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, तसेच विश्वस्त सदस्य, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी विवेकांनद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कांचन यांनी पालकांना मुलांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याचे आवाहन केले.”

शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 चा वार्षिक अहवाल सादर केला. शाळेची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचे यश आणि भावी योजना त्यांनी यावेळी मांडल्या. पालकांनी शाळेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

“आपली मुले नवरत्नांप्रमाणे अद्वितीय असून योग्य संस्कार, शिस्त आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे तेज उजळवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्व-प्राथमिक प्रवेश प्रक्रिया जानेवारी 2026 पासून सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

दरम्यान, सुमारे चार तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नऊ रत्नांचे महत्त्व व त्यांचा मानवी गुणांशी असलेला संबंध नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुमारे 3 हजार प्रेक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील समन्वय, ऊर्जा आणि कलात्मकता पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे पालक, पाहुणे व विश्वस्त सदस्यांनी भरभरून कौतुक केले. नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि नृत्य दिग्दर्शकाच्या योगदानाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

अभिमान, प्रेरणा आणि आनंदाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. “ज्ञान, संस्कृती आणि उत्कृष्टता” ही स्वामी विवेकानंद ॲकॅडमीची ध्येयधारणा या स्नेहसंमेलनातून अधिक ठळकपणे अधोरेखित झाली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52
Next Post
Bhigwan News: Horrific accident in Bhigwan! A 'Shivshahi' van blew up while crossing the road; the youth died on the spot

Bhigwan News: भिगवणमध्ये भीषण अपघात! रस्ता ओलांडताना 'शिवशाही'ने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp