Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शेळ्या बोकड चोरी प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, 5 गुन्हे उघडकीस

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 28 December 2025, 18:31
Shirur News: Two accused in goat theft case arrested; Performance of Ranjangaon MIDC police, 5 crimes exposed

शिरूर: रांजणगाव एमआयडीसी (Shirur News) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांकडील शेळी व बोकड चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली. या (Pune Crime) कारवाईत आरोपींनी केलेल्या 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Latest Marathi News)

 

गणेश कैलास ब्राम्हणे (वय-21) व सुनील अण्णाभाऊ माळी (वय -24, रा. दोघेही गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना गव्हाणवाडी परिसरातून अटक केली. तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव खालसा व शिरूर तालुका परिसरातून शेळी-बोकड चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांच्या शेळी व बोकड चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत माणिक रामभाऊ काळे (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांनी शेळी व बोकड चोरी केल्याची फिर्याद रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.

या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड व किशोर शिवणकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान शिरूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) येथील दोन युवक मोटारसायकलवरून शेळी-बोकडे चोरून नेत आहेत.

त्यानुसार तपास पथकाने आरोपी गणेश ब्राम्हणे व सुनील माळी यांना गव्हाणवाडी परिसरातून अटक केली.आरोपींकडून 25 बोकडे, 01 शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण अंदाजे 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 05 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेली शेळी-बोकडे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितिन भोस, संदिप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हवालदार नितिन भोस, संदिप जगदाळे, नितेश हुडे हे करीत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Crime: Dream of becoming an instant millionaire shattered! Smuggling of whale vomit in Alandi; Accused arrested with goods worth Rs 1 crore 30 lakhs

Pune Crime: झटपट करोडपती होण्याचं स्वप्न भंगलं! आळंदीत 'व्हेल' माशाच्या उलटीची तस्करी; 1 कोटी 30 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.