Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाढदिवसाला न बोलावल्याने शेतकऱ्याचे घरच पेटवले, माथेफिरू तरुणाच्या कृत्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 6 January 2026, 11:25

Shirur Crime: शिरुर, ता. 06 : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावले नाही, या किरकोळ कारणातून निमोणे (ता. शिरूर) येथे एका माथेफिरू तरुणाने शेतकऱ्याच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत ज्ञानदेव चंदर काळे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून रोख रक्कम, दागिने, कपडे व घरगुती साहित्य असे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने काळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.

 

हेही वाचा- नसरापूरमध्ये चहाच्या दुकानात सत्तूर काढून हल्ल्याचा प्रयत्न, वादातून शेतकऱ्याच्या हाताला जखम; राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी निखिल ज्ञानदेव काळे (रा. निमोणे, भोसवस्ती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. त्यानुसार अक्षय संतोष वाळुंज (रा. शिंदोडी, ता. शिरूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल काळे यांच्या वाढदिवसाला अक्षय वाळुंज याला आमंत्रण न दिल्याने दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या घटनेचा राग मनात धरून अक्षय याने बदला घेण्याची धमकी दिली होती.

रविवारी (ता. 04) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अक्षय याने काळे यांच्या झोपडीवजा घरावर पेट्रोल ओतून आग लावली. आगीच्या प्रकाशामुळे वेळीच जाग आलेल्या कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही मिनिटांतच संपूर्ण घर जळून खाक झाले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अक्षय वाळुंज हा मोटारसायकलवरून परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गोविंद खटिंग अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या आगीत काळे कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने निमोणे येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करून ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले असून पीडित कुटुंबाला मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न केला जात आहे

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

हजार रुपये रोजंदारी अन् मटण थाळी! निवडणुकीत भाडोत्री कार्यकर्त्यांची चंगळ; उमेदवारांचे खिसे रिकामे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.