Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 July 2026, 13:25

पुणे: पुणे-लोणावळा महामार्गावर पर्यटकांना अमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक घटनेत पुणे ग्रामीण पोलीस दलातील ६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, कामशेत पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ४ पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल ७ तास ओलीस ठेवले होते, मात्र एका तरुणाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला.

फिर्यादी शुभजीत उमेश शर्मा आपल्या मित्रांसह ५ जुलै २०२६ रोजी कारने (MH 12 WZ 1692) लोणावळ्याला जात होते. रात्री ८:३० च्या सुमारास कामशेत परिसरात आरोपी ६ जणांनी त्यांची गाडी अडवली. गाडीची तपासणी करताना त्यांनी एक सिगारेटचे पाकीट जप्त केले आणि त्यात गांजा असल्याचा खोटा आरोप केला. पोलीस कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पर्यटकांकडे ५ लाख रुपयांची मागणी केली आणि त्यांना तळेगाव येथील एटीएमवर नेऊन पैसे देण्यास भाग पाडले.

या कठीण प्रसंगात, फिर्यादीच्या मित्राने प्रसंगावधान राखत आपल्या ‘स्मार्ट वॉच’वरून एका मित्राला आणीबाणीचा (SOS) संदेश पाठवला. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत पर्यटकांची सुटका केली. सुरुवातीला हे कृत्य काही गुन्हेगारांचे असावे असे वाटले होते, परंतु  आरोपींपैकी ३ कर्मचारी हे हायवे सुरक्षा पथकाचे पोलीस असून ३ जण होमगार्ड आहेत. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39

PM किसानचा 24वा हप्ता अडकणार की खात्यात जमा होणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Thursday, 1 October 2026, 10:35

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण! मुलाच्या जबाबाने ठाण्यातील बड्या नेत्याची अडचण वाढली,तपास आता CIDकडे

Thursday, 1 October 2026, 10:22

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46
Next Post

सेवा रस्त्यावर धोकादायक खड्डा, पालखी आगमनापूर्वी सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp