Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paud News: पुण्यात कुस्तीच्या आखाड्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! तासभराची झुंज अन् अचानक ‘तो’ आत घुसला; माऊली कोकाटे-सिकंदर शेखमध्ये बाचाबाची

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 17:23
Paud News: High-voltage drama in a wrestling arena in Pune! An hour-long fight and suddenly 'he' enters; Mauli Kokate-Sikander Sheikh fight

पुणे : कुस्तीच्या आखाड्यात दोन बलाढ्य मल्ल (Paud News) आमनेसामने आले की प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो. ताकद, तंत्र आणि जिद्दीची पराकाष्ठा पाहायला मिळते. मात्र मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत रंगलेल्या 11 लाखांच्या इनामी लढतीला गालबोट लागले आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या झुंजीदरम्यान एका समर्थकाने थेट आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. (Maharashtra Kesari)

 

17 फेब्रुवारी रोजी झालेल्या या हायव्होल्टेज लढतीसाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी पौडमध्ये जमले होते. आयोजकांनी कुस्ती निकालीच लावली जाईल, असे स्पष्ट केल्याने दोन्ही पैलवान पूर्ण ताकदीने भिडले होते. सुरुवातीपासूनच चुरशीची झुंज रंगली. जवळपास तासभर दोघेही एकमेकांवर डावपेच आजमावत होते.

वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी झुंज अधिक आक्रमक झाली. माऊली कोकाटेने सिकंदरच्या मानेवर जोरदार पकड घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. सिकंदरने जाब विचारताच काही क्षणांतच बाचाबाची सुरू झाली आणि वातावरण तापू लागले.

याचदरम्यान आखाड्याच्या कडेला उभा असलेला माऊली जमदाडेचा एक समर्थक अचानक आत शिरला. काही कळण्याआधीच त्याने सिकंदर शेखकडे धाव घेत हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. आयोजक आणि पंचांची धावपळ उडाली. काही क्षण आखाड्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने सिकंदर शेखचे गुरु विशाल हारगुळे स्वतः आखाड्यात उतरले. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत करत पुन्हा कुस्ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कुस्तीविश्वात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

तासभर चाललेल्या झुंजीमुळे आणि त्यानंतरच्या वादामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला. बराच वेळ होऊनही स्पष्ट निकाल लागत नसल्याचे पाहून अखेर आयोजकांनी मध्यममार्ग स्वीकारला. कुस्ती सोडवण्यात आली आणि दोन्ही पैलवानांना विजयी घोषित करण्यात आले.

मात्र या घटनेनंतर आखाड्यातील शिस्त आणि खेळाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पारंपरिक कुस्तीच्या मैदानात समर्थकांचा हस्तक्षेप होणे ही गंभीर बाब मानली जात असून भविष्यात अशा स्पर्धांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58
Next Post

पाण्याच्या पाईपने घेतला जीव! किचनमधून मोठा आवाज आला.. अन् 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.