Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काँक्रिटीकरणानंतर रस्त्याला मोठ्या भेगा! भिगवणमध्ये कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; तपासणीची केली मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 September 2026, 12:15

सागर जगदाळे

भिगवण: भिगवण शहरातील वॉर्ड क्रमांक १ ते ४ मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या कामाची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, तसेच काम निकृष्ट आढळल्यास नियमानुसार संबंधित ठेकेदार अथवा जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करून काम दुरुस्त करून घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालय, भिगवण यांच्या वतीने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भिगवण येथील उपअभियंत्यांना पत्र देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक गुरप्पा गंगाराम पवार यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले आहे.
पत्रानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वॉर्ड क्रमांक १ ते ४ मधील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

मात्र, कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये अपेक्षित गुणवत्ता व तांत्रिक मानके पाळली गेली नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर अल्प कालावधीतच काही ठिकाणी मोठ्या व खोल भेगा पडल्याचे, तसेच काही ठिकाणी काँक्रिटचे तुकडे व आतील थर उखडल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

पत्रासोबत जोडलेल्या छायाचित्रांमध्ये रस्त्यावर पडलेल्या भेगा तसेच खराब झालेला भाग दाखविण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असून भविष्यात सदर रस्ता मोठ्या प्रमाणात खराब होण्याची शक्यता असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणीची मागणी 

कामाची गुणवत्ता स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असल्यास रस्त्याच्या काँक्रिटचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासणीमध्ये काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित ठेकेदार अथवा जबाबदार व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करून स्वखर्चाने निकृष्ट काम दुरुस्त करून घेण्यात यावे, असेही ग्रामपंचायतीने म्हटले आहे.
याशिवाय वापरण्यात आलेल्या काँक्रिटची गुणवत्ता, काँक्रिटची जाडी, साहित्याचे प्रमाण, काँक्रिटीकरणाची पद्धत, क्युरिंग जॉइंट्स, मंजूर अंदाजपत्रक आणि तांत्रिक Specifications यानुसार काम झाले आहे किंवा नाही, याची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करावा आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीस देण्यात यावी, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
दरम्यान, रस्त्याच्या कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, संबंधित विभागाच्या पाहणी व गुणवत्ता अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन ; गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांकडून 30 गणेश मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Tuesday, 22 September 2026, 13:34

DJ नको, पारंपरिक वाद्ये वापरा म्हणणारे पोलीसच थिरकले DJ च्या तालावर! नऱ्हे पोलिसांच्या गणेश मिरवणुकीवरून आता सवाल

Tuesday, 22 September 2026, 13:32

भिगवणमधील वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 22 September 2026, 13:17

नवजात अर्भकाचे शीर आणि हात धडापासून वेगळे; अर्भकाची अशी अवस्था कुणी केली? दौंडमध्ये खळबळ

Tuesday, 22 September 2026, 13:08

ऐन गणेशोत्सवात बापटांची कोर्टात धाव! लाऊडस्पीकरबाबत मुंबई हायकोर्ट काय सुनावणार?

Tuesday, 22 September 2026, 13:06

राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान कधी? मतमोजणीची तारीखही जाहीर!

Tuesday, 22 September 2026, 12:50
Next Post

साहिल वाकोडे प्रकरणात CCTV फुटेज ठरणार गेमचेंजर? परीक्षा हॉलमध्ये काय घडलं? पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp