Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक! अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 18 September 2026, 9:09

पुणे: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पुढे नेण्यासाठी मध्य रेल्वेकडून पुणे विभागात विशेष कामे हाती घेण्यात येणार आहेत. पुणे आणि हडपसर यार्डमध्ये ट्रॅक, सिग्नल-टेलिकॉम आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे या कालावधीत केली जाणार आहेत. यासाठी 19 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत विविध टप्प्यांमध्ये रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कामामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील नियमित रेल्वेसेवेचे वेळापत्रक काही दिवस बदलणार आहे. काही गाड्या रद्द केल्या जाणार असून काही रेल्वेगाड्या पूर्ण मार्गाऐवजी ठराविक स्थानकांपर्यंतच धावतील. काही सेवांना पर्यायी मार्गाने पाठवले जाणार आहे. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वेची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

पुणे आणि सोलापूरदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या सेवेलाही याचा फटका बसणार आहे. 12169 पुणे-सोलापूर इंटरसिटी आणि 12170 सोलापूर-पुणे इंटरसिटी या दोन्ही गाड्या 19 ते 23 सप्टेंबर तसेच 3 आणि 4 ऑक्टोबरला रद्द करण्यात आल्या आहेत.

सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या दोन सेवांमध्येही बदल करण्यात आला आहे. 12116 ही गाडी 3 ऑक्टोबरला, तर 12115 ही गाडी 4 ऑक्टोबरला रद्द राहणार आहे. हुतात्मा एक्स्प्रेसच्या सेवेतही काही दिवस बदल होणार आहेत. 12157 आणि 12158 या गाड्यांच्या फेऱ्यांवर ब्लॉकचा परिणाम होईल.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात येणार आहेत. मुंबई-चेन्नई, मुंबई-भुवनेश्वर, एलटीटी-काकीनाडा, नागरकोईल-एलटीटी, बंगळुरू-मुंबई आणि विशाखापट्टणम-एलटीटी या मार्गांवरील गाड्यांचाही त्यात समावेश आहे.

पर्यायी मार्गांपैकी काही गाड्या सोलापूर-कुर्डुवाडी-मिरज-सातारा-पुणे या मार्गाने धावतील. तर काही सेवांना दौंड-अहिल्यानगर-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे काही गाड्यांना पुणे, लोणावळा, दौंड आणि उरुळी या स्थानकांवर थांबा किंवा नियमित मार्गाची सेवा मिळणार नाही.

याशिवाय 11422 सोलापूर-पुणे एक्स्प्रेस 3 ऑक्टोबरला हडपसरपर्यंतच चालवली जाईल. 11302 उद्यान एक्स्प्रेसची सेवा त्याच दिवशी सोलापूरपर्यंत मर्यादित राहणार आहे. 11301 मुंबई-बंगळुरू एक्स्प्रेस 4 ऑक्टोबरला सोलापूरहून अंशतः सुरू करण्यात येणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19
Next Post

मलेशिया ट्रिपचा प्लॅन फसला अन् पुण्यातील व्यावसायिक गायब; काही तासांतच समोर आली वेगळीच कहाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp