Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुंतवले 20 हजार अन् 80 हजार मिळाले! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास जिंकून 2.10 कोटींचा गंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 November 2026, 7:58

पुणे : कमी कालावधीत गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सोशल मीडियावरील बनावट जाहिरातीच्या माध्यमातून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला चांगला परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि ईडीच्या कारवाईची भीती दाखवून कोट्यवधी रुपये उकळले. या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक मुंढवा परिसरात एकटे राहतात. सोशल मीडियावर त्यांना गुंतवणुकीची जाहिरात दिसली होती. या जाहिरातीत प्रसिद्ध उद्योगपती, केंद्रीय मंत्री आणि खेळाडूंचे फोटो वापरले होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने कंपनी ब्रिटनमधील असल्याचे सांगत 20 हजार रुपये गुंतवल्यास आठवडाभरात चारपट रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. त्यांनी पैसे भरल्यानंतर खात्यात 80 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला.

यानंतर आरोपींनी मोठ्या रकमा गुंतवण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला 5 लाख रुपये आणि पुढे आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. एका टप्प्यावर ज्येष्ठ नागरिकांनी 1 कोटी 7 लाख रुपये पाठवले. त्यांच्या ऑनलाइन खात्यात गुंतवणुकीची रक्कम वाढून 2 कोटी 80 लाख रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना रक्कम मिळाली नाही.

दरम्यान, 2 जुलै रोजी एका व्यक्तीने फोन करून आपण ट्रायचा अधिकारी असल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांकाचा गुन्ह्यात वापर झाल्याचा आरोप करत मुंबई क्राइम ब्रँच आणि ईडीकडून अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली. मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी पैसे जमा करावे लागतील आणि तपासानंतर ते परत मिळतील, असे सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने त्यांनी 8 ते 15 जुलैदरम्यान आणखी 1 कोटी 4 लाख रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार लगाम? नव्या विधेयकावर चर्चा सुरु

Wednesday, 4 November 2026, 8:22

दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना दणका! पुण्यात FDA ने हजारो किलो साठा केला जप्त

Wednesday, 4 November 2026, 8:16

गुंतवले 20 हजार अन् 80 हजार मिळाले! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास जिंकून 2.10 कोटींचा गंडा

Wednesday, 4 November 2026, 7:58

नोव्हेंबरमध्येही पावसाचा खेळ सुरूच? महाराष्ट्रातील हवामान बदलणार, पाहा कोणत्या जिल्ह्यांत काय स्थिती

Wednesday, 4 November 2026, 7:31

Daily Horoscope: 4 नोव्हेंबरला कोणाची लागणार लॉटरी? ग्रहांची साथ मिळताच या राशींचे नशीब पालटणार!

Wednesday, 4 November 2026, 7:25

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Tuesday, 3 November 2026, 22:59
Next Post

दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना दणका! पुण्यात FDA ने हजारो किलो साठा केला जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp