Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना दणका! पुण्यात FDA ने हजारो किलो साठा केला जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 November 2026, 8:16

पुणे : दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करताना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातील 2 मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कोंढवा बुद्रुक आणि आळंदी परिसरात मिळून तब्बल 1,491 किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या मिठाईची अंदाजे किंमत 2 लाख 94 हजार 900 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पहिली कारवाई कोंढवा बुद्रुकमधील टिळेकर नगर येथील गायत्री लाडू भांडारमध्ये करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी के. व्ही. बारवकर यांच्या पथकाने दुकानाची तपासणी केली. यावेळी 1,008 किलो मोतीचूर लाडू आणि 180 किलो मोतीचूर बुंदी असा एकूण 1,188 किलो साठा आढळला. या मिठाईची किंमत सुमारे 1 लाख 73 हजार रुपये होती. तपासणीनंतर हा संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित विक्रेत्याचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला.

दुसरी कारवाई 2 नोव्हेंबर रोजी आळंदी-मरकळ रोडवरील धानोरे येथील आर. बिकानेर मिठाई केंद्रात करण्यात आली. येथे 1 लाख 21 हजार 200 रुपये किमतीची 303 किलो बर्फी आढळली. हा साठा निकृष्ट दर्जाचा होता. त्यावर आवश्यक लेबल नव्हते आणि खरेदीची बिलेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासनाने बर्फी जप्त करून जागेवरच नष्ट केली. याशिवाय कलाकंदाचा नमुनाही प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

ही कारवाई एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी एच. आर. मारेवार आणि एस. एन. चट्टे यांनी तपासणीत सहभाग घेतला. मिठाई विक्रेत्यांनी पदार्थांची योग्य साठवणूक करावी, पॅकिंगवर आवश्यक माहिती द्यावी आणि खरेदीची बिले जतन करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार लगाम? नव्या विधेयकावर चर्चा सुरु

Wednesday, 4 November 2026, 8:22

दिवाळीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांना दणका! पुण्यात FDA ने हजारो किलो साठा केला जप्त

Wednesday, 4 November 2026, 8:16

गुंतवले 20 हजार अन् 80 हजार मिळाले! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास जिंकून 2.10 कोटींचा गंडा

Wednesday, 4 November 2026, 7:58

नोव्हेंबरमध्येही पावसाचा खेळ सुरूच? महाराष्ट्रातील हवामान बदलणार, पाहा कोणत्या जिल्ह्यांत काय स्थिती

Wednesday, 4 November 2026, 7:31

Daily Horoscope: 4 नोव्हेंबरला कोणाची लागणार लॉटरी? ग्रहांची साथ मिळताच या राशींचे नशीब पालटणार!

Wednesday, 4 November 2026, 7:25

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Tuesday, 3 November 2026, 22:59
Next Post

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार लगाम? नव्या विधेयकावर चर्चा सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp