Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अपुरी जागा, पार्किंगचा प्रश्न अन् गर्दीचा त्रास! इंदापूरात शेळी-मेंढी बाजार स्थलांतराची शेतकऱ्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 November 2026, 12:34

आदित्य बोराटे 

इंदापूर: निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सुरू असलेला शेळी-मेंढी बाजार सध्याच्या अपुऱ्या जागेत भरत असल्याने शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा बाजार बंद न करता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त आवारात स्थलांतरित करावा, अशी मागणी निमगाव केतकी परिसरातील शेतकरी, पशुपालक व व्यापारी बांधवांनी केली आहे.

यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सध्या बाजार भरत असलेल्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने लावण्याचा प्रश्न निर्माण होत असून, बाजारातील गर्दीमुळे सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेळी-मेंढी बाजार हा शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तो बंद करण्याऐवजी अधिक प्रशस्त आणि सुविधायुक्त ठिकाणी सुरू ठेवणे आवश्यक आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजारासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिल्यास पार्किंगसह आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करणे शक्य होईल. त्यामुळे सर्व घटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बाजार स्थलांतराबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने निर्णय घ्यावा, बाजारासाठी स्वतंत्र जागा, पार्किंग व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ‘बाजार बंद नको, जागा बदला! अपुऱ्या जागेचा प्रश्न सोडवा; शेळी-मेंढी बाजार मार्केट कमिटीत हलवा!’ अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी या मागणीची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे निमगाव केतकी परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पहिले लग्न लपवून तरुणाशी विवाह; वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर केले चाकूने वार, लोणी काळभोर येथील चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:45

अपुरी जागा, पार्किंगचा प्रश्न अन् गर्दीचा त्रास! इंदापूरात शेळी-मेंढी बाजार स्थलांतराची शेतकऱ्याची मागणी

Monday, 2 November 2026, 12:34

नायगाव येथे बाकड्यावर बसण्यावरून डम्पर चालकाला लाथाबुक्क्यांसह कोयत्याच्या दांड्याने मारहाण; चौघांवर उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:03

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 11:30

Daund News: गोपाळवाडीत कोयते फिरवत तरुणांची दहशत; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एका अल्पवयीन तरुणाचा समावेश

Monday, 2 November 2026, 11:15

कटफळच्या जानाई देवी मंदिरात 12 लाखांची चोरी! सहा किलोहून अधिक चांदीचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू

Monday, 2 November 2026, 11:01
Next Post

पहिले लग्न लपवून तरुणाशी विवाह; वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर केले चाकूने वार, लोणी काळभोर येथील चार जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp