Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 November 2026, 11:30

लोणी काळभोर, ता. 2 : टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर ही आलिशान गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका शेतकऱ्याची ऑनलाइन पद्धतीने 8 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मुलुंड येथील ॲपेक्स ऑटो हबशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या एकाने गाडी बुकिंग आणि आरटीओ रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 9 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर केवळ एक लाख रुपये परत करून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसन्ना हरिश्चंद्र सावंत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विक्रम रमेश धुमाळ (वय 42 , रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळ आणि त्यांच्या पत्नी तेजल यांनी 8 जुलै 2026 रोजी फॉर्च्युनर लेजेंडर खरेदीसाठी ऑनलाइन चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना मुंबईतील ‘ॲपेक्स ऑटो हब’ची माहिती मिळाली. तेथील प्रसन्ना सावंत याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने गाडीची किंमत 51 लाख 10 हजार रुपये असल्याचे सांगून व्यवहार निश्चित केला.

गाडी बुकिंगसाठी सुरुवातीला एक लाख रुपये गुगल पेने पाठविण्यात आले. त्यानंतर शोरूमच्या खात्यावर पाच लाख रुपये, विमा व कागदपत्रांच्या नावाखाली आणखी एक लाख रुपये आणि आरटीओ रजिस्ट्रेशनसाठी पत्नीच्या खात्यातून आरटीजीएसद्वारे साडेसात लाख रुपये पाठविण्यास सांगितले. याशिवाय गाडीच्या उर्वरित रकमेचाही भरणा करण्यात आला होता.

दरम्यान, प्रसन्ना सावंत याने गाडी कोईम्बतूर येथे असल्याचे सांगून 17 जुलै रोजी स्वतःचे, धुमाळ यांचे आणि त्यांच्या भावाचे विमानाचे तिकीट पाठवले. मात्र, कोईम्बतूरला जाण्याची तयारी केल्यानंतर सावंत फोन उचलत नसल्याने धुमाळ यांना संशय आला. त्यांनी थेट कोईम्बतूर येथील अण्णामलाई टोयोटा शोरूमशी संपर्क साधला असता, गाडीची बुकिंग सिद्धेश प्राइम ऑटोमोटिव्ह, चाकण यांच्यामार्फत झाल्याचे समोर आले. तसेच शोरूमचे काही पैसे बाकी असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.

अखेर चाकण येथील संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर धुमाळ यांनी 11 ऑगस्ट रोजी गाडी ताब्यात घेतली. मात्र, प्रसन्ना सावंत याच्याकडे यापूर्वी दिलेल्या पैशांची मागणी केली असता त्याने केवळ एक लाख रुपये परत केले. उर्वरित साडेआठ लाख रुपये अद्याप परत केले नाहीत.

गाडी खरेदीच्या व्यवहारात विश्वास संपादन करून पैसे उकळणे, गाडी बुकिंग झाल्याचे भासवणे आणि कोईम्बतूरला जाण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवून दिशाभूल केल्याप्रकरणी विक्रम धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसन्ना सावंत याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 316(2),318(4),336(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 11:30

Daund News: गोपाळवाडीत कोयते फिरवत तरुणांची दहशत; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एका अल्पवयीन तरुणाचा समावेश

Monday, 2 November 2026, 11:15

कटफळच्या जानाई देवी मंदिरात 12 लाखांची चोरी! सहा किलोहून अधिक चांदीचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू

Monday, 2 November 2026, 11:01

भीमाशंकरच्या जंगलाला मिळणार संरक्षण! भोरगिरी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी; 15 गावांचा समावेश

Monday, 2 November 2026, 10:40

कृषी विभागातील वर्ग-1 अधिकारी अन् उत्पन्नापेक्षा 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पुण्यात अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 10:27

ऑक्टोबरच्या उकाड्याला पावसाचा दणका; वरुणराजाच्या पुनरागमनाने पुणेकर सुखावले! भोरमध्ये ६७, शिरूरमध्ये ४५.५ मिलिमीटर पावसाची नोंद

Monday, 2 November 2026, 10:06
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp