Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 22 September 2026, 17:57

लोणी काळभोर, (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ताण दिल्याने आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले असतानाच, मंगळवारी (ता. 22) दुपारपासून लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून, शेतकरी वर्ग पूर्णपणे सुखावला आहे. उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, थेऊर, आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ व अष्टापूर परिसरात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या.

या वर्षी पावसाने सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे ऊस, तरकारी (भाजीपाला), मका आणि चारा पिके सुकू लागली होती. पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, पिकांना मोठी नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे विहिरी व कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील गावातील अंतर्गत रस्ते व मुख्य चौक परिसरात पावसाचे पाणी साचले होते. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची काही काळ धांदल उडाली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना आणि चाकरमान्यांना पावसाच्या आगमनामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, “गेल्या काही दिवसांपासून पावसाची अत्यंत गरज होती. हा पाऊस वेळेवर आल्याने उसाच्या आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे. या पावसामुळे शेतातील कामांना वेग येईल,” अशी प्रतिक्रिया शेतकरी संभाजी कांचन यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41

गणेश विसर्जनात कोर्टाची कडक एंट्री! ढोल-ताशांचा ‘टोल’ अन् फटाक्यांवर थेट बंदी

Tuesday, 22 September 2026, 18:33

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

Tuesday, 22 September 2026, 17:57

पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! २६ ऐवजी आता २७ सप्टेंबरला होणार आंदोलन

Tuesday, 22 September 2026, 17:56

रस्त्यासाठी भावकीत टोकाचा संघर्ष!एकाचा खून, 13 शिकलेली तरुणं तुरुंगात; साहेब होण्याची स्वप्नं गजाआड…

Tuesday, 22 September 2026, 17:40
Next Post

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp