Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

५० कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार करणारी टोळी गजाआड; हरियाणा-राजस्थानमधून चार आरोपी जेरबंद, पिस्तुले व ३० जिवंत काडतुसे जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 July 2026, 17:44

लोणी काळभोर, ता. ७ : पुण्यातील एका नामांकित उद्योगपतीकडे ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून कंपनीच्या प्रवेशद्वारावर भरदिवसा गोळीबार करत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हरियाणा व राजस्थानमध्ये सलग पाच दिवस धडक शोधमोहीम राबवत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे उद्योगपतींमध्ये निर्माण झालेली भीती कमी झाली असून, खंडणीसाठी गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पवन प्रकाशराम बारड (वय २४), सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (वय २५), रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी एका नामांकित व्यावसायिकाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, खंडणीची मागणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत दोन शूटरनी संबंधित कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

या गंभीर घटनेनंतर पुणे गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्यात आली. मात्र, गुन्हा केल्यानंतर आरोपी हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये पसार झाले होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून संबंधित राज्यांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. सलग पाच दिवसांच्या कारवाईनंतर २ जुलै रोजी राजस्थानातील हनुमानगड येथून पवन बारड याला अटक करण्यात आली. त्यानंतर ४ जुलै रोजी कंपनीतील माहिती आरोपींपर्यंत पोहोचवणारा कामगार सत्यप्रकाश शिलोरा यालाही अटक करण्यात आली.

 

त्यानंतर ७ जुलै रोजी पहाटे राजस्थानातील हनुमानगड रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून मुख्य आरोपी रवीकुमार जांगडा आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपी रवीकुमार जांगडा याच्याकडून एक गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे, तर विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून दोन गावठी पिस्तुले आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण कारवाईत पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये व्यापक शोधमोहीम राबवून आरोपींना जेरबंद केले. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, प्रशांत अन्नछत्रे, अमर कदम यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने , पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष शेटे, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक जिवन माने, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, प्रसन्ना जराड, श्रीकांत चव्हाण, छबु बेरड, नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, अभिजीत पवार, दत्तात्रय काटम, दिग्वीजय चौगुले, संदीप कोळपे, योगेश कोतकर महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बदल्यांचा ‘महा-धडाका’ सुरूच! ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Wednesday, 8 July 2026, 22:58

उंड्रीत स्पार्कलिंग लाईट तयार करताना स्फोट; ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

Wednesday, 8 July 2026, 22:15

विमाननगरमध्ये हायप्रोफाईल स्पावर छापा! अल्पवयीन मुलीसह ३ महिलांची सुटका; स्पा मॅनेजर अटकेत

Wednesday, 8 July 2026, 21:28

शिरूर पोलिसांची मोठी कामगिरी! डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद; १८ गुन्हे उघड, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 8 July 2026, 20:35

पुणे-मुंबई प्रवास आजही ठप्प! रेल्वे मार्गाची दुरुस्ती अपूर्ण, बुधवारीही गाड्या रद्दच; प्रवाशांची धावपळ कायम

Wednesday, 8 July 2026, 20:28

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार बंद, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे ग्रामपंचायत प्रशासकांना आदेश

Wednesday, 8 July 2026, 20:10
Next Post

शरद पवार मोदींबरोबर जाणार? पवारांचा नवा डाव, जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीत खलबतं; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.