Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीत ‘मोठा भाई’ असल्याची बतावणी करत ट्रकचालकाकडून उकळली खंडणी; चापट मारून 10 हजार लुटले

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 September 2026, 10:58

वाघोली, ता. 14 : वाघोली (ता. हवेली) परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी स्टीलचा माल घेऊन आलेल्या ट्रकचालकाला ‘मी या भागाचा मोठा भाई आहे’ अशी धमकी देत खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माल खाली करण्यासाठी प्रत्येक गाडीमागे पैसे द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपीने यापूर्वी दोन वेळा प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी पैसे देण्यास नकार दिल्याने ट्रकचालकाच्या गालावर चापट मारून त्याच्याकडील 10 हजार 500 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आहेत.

याप्रकरणी विठ्ठल शेषराव गर्जे (वय 31, रा. आष्टी, जि. बीड) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नवनाथ रिकामे (रा. आव्हाळवाडी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्जे हे सन 2020 पासून खराडी येथील नाथकृपा रोडलाईन्स अँड स्टील सप्लायर्स या कंपनीत चालक म्हणून काम करतात. कंपनीच्या आदेशानुसार ते पुणे शहर व परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पांवर स्टीलचा माल पोहोचवतात. सध्या ते एमएच 12 टीव्ही 9933 क्रमांकाच्या ट्रेलरवर चालक म्हणून कार्यरत आहेत.

गेरा आयओजे, वाघोली येथील बांधकामाच्या ठिकाणी स्टीलचा माल खाली करण्यासाठी गर्जे ऑगस्ट महिन्यात गेले होते. त्यावेळी नवनाथ रिकामे याने स्वतःला त्या भागातील रहिवासी आणि ‘भाई’ असल्याचे सांगत, गँगस्टर लोकांशी ओळख असल्याची बतावणी केली. प्रत्येक गाडीमागे पाच हजार रुपये द्यावे लागतील, पैसे न दिल्यास माल खाली करू देणार नाही आणि येथून जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. घाबरलेल्या गर्जे यांनी त्यावेळी पाच हजार रुपये दिले. यानंतर ऑगस्ट महिन्यातच दुसऱ्या ट्रिपवेळीही रिकामे याने अशाच प्रकारे धमकावून आणखी पाच हजार रुपये घेतले. वारंवार याच ठिकाणी माल घेऊन यावे लागणार असल्याने भविष्यात त्रास होऊ नये, या भीतीने गर्जे यांनी याबाबत कोणाला काही सांगितले नाही.

दरम्यान, गर्जे हे 67 टन स्टील घेऊन गेरा आयओजे येथील बांधकामाच्या ठिकाणी 9 सप्टेंबर रोजी गेले. जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी ट्रेलर तेथेच पार्क केला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास माल खाली करण्यासाठी गाडी लावत असताना नवनाथ रिकामे पुन्हा तेथे आला. त्याने नेहमीप्रमाणे पाच हजार रुपयांची मागणी केली. गर्जे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने रिकामे याने दमदाटी सुरू केली.

 

‘मी या ठिकाणचा मोठा भाई आहे. पैसे दिले नाही तर गाडी खाली करू देणार नाही आणि तुला येथून जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देत त्याने गर्जे यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 10 हजार 500 रुपये जबरदस्तीने घेतले आणि पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावरून तेथून निघून गेला. या प्रकारामुळे घाबरलेल्या गर्जे यांनी त्याच दिवशी रात्री कंपनीत परतल्यानंतर मालक बबन सांगळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सांगळे यांच्यासोबत वाघोली पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगेंचा मोठा निर्णय! पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी एकट्याने मुंबईकडे जाण्याची घोषणा

Monday, 14 September 2026, 12:43

व्हीएसआयच्या अनुदानाचा हिशेब अखेर स्पष्ट! 131 कोटी मिळाले, संशोधनावर खर्च मात्र 348 कोटी

Monday, 14 September 2026, 12:33

पाण्याच्या पाटातून भडकल्या आगीच्या ज्वाळा; जत तालुक्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 12:25

कोटींची संपत्ती अन् आमदार रस्त्यावर भिकारी बनले! पराग शहांच्या अनोख्या प्रयोगाने मुंबईत चर्चा

Monday, 14 September 2026, 12:19

नवले पुलाजवळ अभिनेत्रीशी गैरवर्तन! अपघाताचे निमित्त अन् दोघांनी केला धक्कादायक प्रकार

Monday, 14 September 2026, 11:45

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त! 7,200 पोलीस तैनात, AI कॅमेऱ्यांची नजर, 701 सराईतांवर कारवाई

Monday, 14 September 2026, 11:36
Next Post

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त! 7,200 पोलीस तैनात, AI कॅमेऱ्यांची नजर, 701 सराईतांवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp